Rashmi Shukla Latest News Sarkarnama
मुंबई

Rashmi Shukla पुन्हा महाराष्ट्रात येणार ? ; शिंदे-फडणवीसांची मेहेरबानी, केंद्रात फिल्डिंग

Rashmi Shukla : शिंदे-फडणवीस सरकारने केंद्र सरकारकडे फिल्डिंग लावली असल्याचे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले.

सरकारनामा ब्युरो

Rashmi Shukla :सध्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर असलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला (IPS Rashmi Shukla)यांची मुंबईच्या पोलीस आयुक्त अथवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात येणार अशी चर्चा आहे.

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने चौकशीतून त्यांना दिलासा मिळाल्यानंतर त्यांना राज्याच्या सेवेत परत येऊन महत्त्वाचे पद देण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने केंद्र सरकारकडे फिल्डिंग लावली असल्याचे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले.

रश्मी शुक्ला यांच्या विरोधातील तपास बंद करण्यात आल्यावर त्यांनी पोलीस महासंचालकपदी पात्र ठराव्यात म्हणून केंद्र सरकारमध्ये प्रयत्न सुरू केले आहेत. केंद्रात पोलीस महासंचालकपदाकरिता पात्र ठरल्यावर त्या राज्याच्या सेवेत पोलीस महासंचालकपदी येण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

फोन टॅपिंग प्रकरणामध्ये (Phone tapping) शुल्का यांचा सहभाग असल्याचा आरोप महाविकास आघाडी सरकारने केला होता. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांची चौकशी करण्यात आली होती. हा तपास शिंदे-फडणवीस सरकारने बंद केला आहे. त्यामुळे पोलीस महासंचालकपदी पात्र ठराव्यात या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. शुक्ला या पुन्हा महाराष्ट्रात येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

अवैधरित्या फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांना दिलासा मिळाला आहे. शुक्ला यांच्याविरोधात खटला चालवण्यास राज्य सरकारने नकार दिला असून खटला चालवण्यासाठी मागितलेली परवानगी गृह खात्याने नाकारलेली आहे. रश्मी शुक्ला यांच्यावर बेकायदेशीर फोन टॅपिंगचे गंभीर आरोप झाले होते. त्यानंतर तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांची समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल सादर केल्यानंतर शुक्ला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT