Nitesh Rane 

 

Sarkarnama

मुंबई

हरवला आहे! माहिती देणाऱ्यास एक कोंबडी बक्षीस...

शिवसेनेचे (Shivsena) कार्यकर्ते संतोष परब (Santosh Parab) हल्ला प्रकरणात भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) कार्यकर्ते संतोष परब (Santosh Parab) हल्ला प्रकरणात भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. जिल्हा सत्र न्यायालयात त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. यावरून आता पोस्टरबाजी सुरू झाली आहे. नितेश राणेंचे पोस्टर मुंबईत लावण्यात आल्याचे समोर आले आहे. यामुळे राणे प्रकरण आणखी पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नितेश राणे यांच्या विरोधात मुंबईत पोस्टरबाजी सुरू झाल्यानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपचे आमदार प्रसाद लाड आणि कालिदास कोळंबकर यांनी माटुंगा पोलीस ठाण्यात कार्यकर्त्यांसह धाव घेतली. या वेळी आमदार लाड म्हणाले की, मुंबईत राणेंच्या विरोधात पोस्टरबाजी झाली. त्या पोस्टरबाजांवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी आम्ही केली आहे. पोलिसांनी कार्यकर्त्यांची तक्रार घेतली नाही म्हणून आम्हाला यावे लागले. यामागे कोणाचा हात आहे याचा शोध घ्यायला हवा.

दरम्यान, काल (ता.30) नितेश राणेंचे बॅनर त्यांच्या समर्थकांनी दादर परिसरात लावले होते. शंभर कुत्री मिळून एकट्या वाघाची शिकार करू शकत नाहीत, असा मजकूर त्या बॅनरवर लिहिला होता. या बॅनरवर नितेश राणेंसोबत नारायण राणेंचाही फोटो आहे. पोलिसांना काही वेळातच हा बॅनर काढून टाकला. नितेश राणे यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर म्याव म्याव आवाज काढल्यापासून राणे विरुद्ध शिवसेना वाद सुरू झाला आहे. आता या बॅनरवरून हा वाद आणखी वाढला आहे.

नितेश राणे यांच्या वतीने जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. त्यावर सलग तीन दिवस न्यायालयात सुनावणी सुरू होती. न्यायालयाने काल त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. न्यायालयाकडून त्यांना तातडीने कोणताही दिलासा मिळालेला नाही. त्यांच्यासमोर आता उच्च न्यायालयात जाण्याचा एकमेव पर्याय शिल्लक आहे.

न्यायालय राणेंच्या जामिनावर निर्णय दिला असला तरी पोलीस दलाने आधीपासूनच पूर्ण तयारी केली आहे. कणकवली पोलीस ठाण्यात हालचालींना वेग आला आहे. पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी कणकवली पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, नितेश राणे सध्या नॉट रिचेबल आहेत. कालपासून त्यांचा मोबाईल नॉट रिचेबल येत आहे. संतोष परब हल्ला प्रकरणात अटक होण्याच्या शक्यतेने ते गायब झाल्याची चर्चा सध्या सुरु आहेत. त्यामुळे सिंधुदुर्गात शिवसेना-भाजपमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. कणकवली पोलिसांकडून नितेश राणे यांचा शोध सुरु असून पोलिसांची पथके गोव्यातही त्यांच्या शोध घेण्यासाठी रवाना झाली आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT