Amruta Fadnavis
Amruta Fadnavis  Sarkarnama
मुंबई

Amruta Fadnavis : अमृता फडणवीसांच्या विरोधात पोस्ट करणे भाजप नेत्याला पडले महागात, थेट तडीपारीची कारवाई!

सरकारनामा ब्यूरो

Amruta Fadnavis : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यासंबंधी भाजपच्याच एका नेत्याने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अशी पोस्ट करणं त्या भाजप पदाधिकाऱ्याला चांगलेच महागात पडले. त्याच्य़ा विरोधात पोलीस तक्रार तर करण्यात आली, पक्षातून त्यांची हकालपट्टीही करण्यात आली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातला या भाजप नेत्याची हकालपट्टी केली आहे. गोंडपिपरी येथील भाजप कार्यकर्त्यांनी नोंदवलेल्या तक्रारीनंतर महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम ५६ (१) (ए) (बी) अन्वये खेमचंद गरपल्लीवार यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. नगर परिषद निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आलेले खेमचंद गरपल्लीवार आणि त्यांच्या पत्नी यांनी दोन महिन्यांपूर्वी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता.

पोलिसांच्या माहितीनुसार, अमृता फडणवीस यांच्या फोटोवर सोशल मीडियावर जातीय तेढ निर्माण होईल अशी आक्षेपार्ह वादग्रस्त पोस्ट करण्यात आली होती. महिलांना लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य गोंडपिपरी पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या खेमदेव ऊर्फ खेमचंद किसनराव गरपल्लीवार (वय 49) रा. तुकडोजीनगर, गोंडपिपरी ता. गोंडपिपरी याने केले होते. गरपल्लीवार याला आता एका वर्षासाठी चंद्रपूर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT