Prabhakar Sail 
मुंबई

प्रभाकर साईलनं आणखी एक गौप्यस्फोट करुन एनसीबीला पाडलं तोंडावर

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची चौकशी सुरू आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांची चौकशी सुरू आहे. त्यांच्यावर या प्रकरणातील पंच प्रभाकर साईलने (Prabhakar Sail) गंभीर आरोप केले आहेत. परंतु, साईल हा चौकशीसाठी हजर राहिला नसल्याचे एनसीबीने म्हटले होते. आता साईलने आणखी एक गौप्यस्फोट करुन एनसीबीला तोंडावर पाडलं आहे.

वानखेडेंच्या चौकशीत साईल हा सहकार्य करीत नसल्याचे एनसीबीने म्हटले होते. यावर साईलच्या वतीने वकील हेमंत इंगळे यांनी आज एनसीबी कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेतली. साईलला समन्स बजावण्यात आलेले नव्हते आणि त्याच्याशी एनसीबीने कोणत्याही प्रकारचा संपर्क साधला नव्हता, असा दावा त्यांनी केला. त्यांनी म्हटले आहे की, साईल हा लपून बसलेला नाही. तो मुंबईत असून, चौकशीत सहकार्य करण्यास तयार आहे. एनसीबीला त्याचा जबाब नोंदवायचा असेल त्यांनी योग्य प्रक्रियेचे पालन करायला हवे. याचसाठी आजच मी एनसीबी अधिकाऱ्यांची भेट घेतली.

महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि क्रूझ पार्टी प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईल यांनी केलेल्या आरोपांमुळे वानखेडे यांची खात्यांतर्गत चौकशी सुरू केली आहे. या चौकशीसाठी एनसीबीचे 5 सदस्यांचे पथक दिल्लीहून मुंबईत दाखल झाले होते. या पथकात एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वरसिंह यांच्यासह 5 अधिकारी होते. या पथकाने वानखेडे यांचा जबाब नोंदवला होते. चौकशी पथकासमोर हजर झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना वानखेडे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

वानखेडे यांच्यावर साईलने गंभीर आरोप केले आहेत. आर्यन खानला सोडण्यासाठी मध्यस्थातर्फे २५ कोटी रुपयांची मागणी शाहरुख खानकडे करण्यात आली होती, असा दावाही साईलने केला आहे. वानखेडे यांनी सांगितल्यानंतर आपण पंच म्हणून कोऱ्या कागदावर सही केल्याचेही साईल यांनी सांगितले होते. आपल्या जीवाला धोका असल्याने एवढे दिवस आपण गप्प होतो, असा दावा प्रभाकर साईल याने केला होता.

क्रूझ पार्टीप्रकरणात पुरावे म्हणून साईलने काही फोटो आणि व्हिडीओ देखील सादर केले आहेत. त्यातील एका व्हिडीओमध्ये आर्यनला अटक करून एनसीबी कार्यालयात आणल्यानंतर किरण गोसावी आर्यन खानजवळ बसून त्याच्या फोनवरून कुणाशी तरी बोलणे करून देत असल्याचे दिसत होते. साईल यांला आता मुंबई पोलिसांनी संरक्षण दिले आहे. त्याच्या तक्रारीवर पोलिसांनी कार्यवाही सुरू केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT