Mumbai News, 01 Feb : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे राज्यातील राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एकीकडे अजित पवारांच्या निधनानंतर अवघ्या चार दिवसांत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्या निधनानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार याबाबतच्या चर्चांना उधाण आलं असतानाच आता एक मोठी बातमी समोर येत आहे.
ती म्हणजे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचा मोठा दावा भाजपचे नेते तथा केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केला आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत पियुष गोयल यांनी प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती केल्याचं मोठं वक्तव्य केलं आहे.
मात्र, याबाबतची अधिकृत घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अद्याप करण्यात आलेली नाही. तर पीटीआयशी बोलताना पियुष गोयल म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा भाग असून त्यांची कामगिरी उत्तम आहे. राष्ट्रवादी पक्षाचं नेतृत्व आधी अजित पवारांकडे आणि आता सुनेत्रा पवारांसोबत आहे. प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यामुळे आता पक्षाच्या विलीनिकरणासाठी शरद पवारांना आमंत्रित करतील असं मला वाटत नाही. कारण जनतेचा विश्वास शरद पवारांनी गमावला आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये दोन्ही पक्ष एकत्र येऊनही त्यांचा पराभव झाल. मात्र, अजित पवार महायुतीत असते ते विजयाचा भाग असते."
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.