Prakash Ambedkar Speech :  Sarkarnama
मुंबई

Prakash Ambedkar Speech : ...अखेर इंडिया आघाडीच्या मंचावरून आंबेडकरांचा मोदी-शहांवर हल्लाबोल!

Chetan Zadpe

Mumbai News : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडा न्याय यात्रेची सांगता आज छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावरती इंडिया आघाडीची जाहीर सभेने होणार झाली आहे. यासाठी इंडिया आघाडीतील सर्व पक्षांचे पक्षप्रमुख आणि महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत. या इंडिया आघाडीच्या मंचावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही भाषण केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. (Latest Marathi News)

आंबेडकर म्हणाले, "मी समजतो आपण हुकूमशाही प्रवृती विरोधात लढलं पाहिजे. आपण सोबत असू किंवा नसू मात्र मोदींविरोधात लढलं पाहिजे. आता निवडणूक रोख्यांचा विषय आला आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह मीडियात वक्तव्य करत सुटलेत की, आम्ही काळा धन संपवलं. आता या निवडणूक रोख्यांमध्ये गेमिंग फ्युचर या कंपनीचा नेट प्रॅाफिट 215 करोड रुपये आहे. त्या कंपनीने 1300 करोड रुपये पक्षांना देणागी कशी देते? हे 1300 कोटी कुठून आले?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

"मोदी म्हणतात देश माझा परिवार आहे, पण या देशातली एक स्त्री ज्या त्यांच्या पत्नी आहेत, त्या मोदींच्या परिवाराचा भाग आहेत की नाही? देश जर कुटुंब असेल तर पत्नीला सोबत घेतलं पाहिजे. साथ दिली पाहिजे. हा वैयक्तिक मुद्दा आहे मान्य आहे, पण हिंदू संस्कृतीबद्दल तेच बोलत असतात, कल्चर नॅशनॅलिझन हा त्यांचा मुद्दा आहे," असे आंबेडकर म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT