EKnath Shine
EKnath Shine Sarkarnama
मुंबई

Prakash Ambedkar : मुख्यमंत्री शिंदेंनी केली आंबेडकरांशी बंद दाराआड चर्चा ; नेमकं काय शिजतयं?

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसेवा प्रकाश आंबेडकर यांची आज मुंबई येथे भेट झाली. दोघांमध्ये दरम्यान बंद दाराआड 15 मिनिट चर्चा झाली. यामुळे वंचित आणि शिंदे गट, असं राजकीय समीकरण उदयास येणार, अशी चर्चा रंगली होती. मात्र आमच्यात कोणतीही चर्चा झाली नाही, इंदू मिलच्या संदर्भात ही चर्चा झाली, असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आंबेडकर म्हणाले, इंदू मिलचं जे स्मारक होत आहे , त्या संदर्भात चर्चा झाली. मी त्यांना सांगितलं की, संयुक्त राष्ट्रांमध्ये २००३ साली, भारत सरकारचं सोशल अजेंड्याखाली फार मोठा पराजय झाला. या पराजयाची चर्चा अटलबिहारी वाजपेयींनी माझ्यासोबत केली होती. मी त्यांना त्यावेळी सांगितलं, आपल्याकडे कसलीही साधनं नाही, की जी आंतरराष्ट्रीय स्तरावर मूल्यमापन करून देणारी नाही. आपल्याकडे जी काही संस्थान आहे, ते फॉरीन एफएस विभाग एवढेच आहे. दुसरी यंत्रणा आपल्याकडे काहीच नाही. म्हणून भारत सरकारला अपयश आलं, आता या परिस्थिती बदलता यावी याबाबत चर्चा केली.

मुंबईत १४ एकर जागा आहे. आणि मुंबई हे भारताचं इंटरनँशनल सेंटर आहे. मुख्यमंत्री म्हणून आपल्याला शक्य होणार असेल. काँग्रेसच्या सरकारमध्ये त्यावेळी झालं नाही. आपल्या सरकारमध्ये १४ एकर जागेत, जर तिथे रिसर्च सेंटर जर काढता आलं, तर तो आपण प्रयत्न करावा, याबाबतची चर्चा झाली, असेही आंबेडकर म्हणाले.

आम्ही भाजपसोबत जाणार नाही, त्यामुळे शिंदे - भाजप - आणि वंचित अशी युती घडून येणार नाही. मात्र महाविकास आघाडीकरून जर सकारात्मक प्रतिसाद आला नाही, तर वंचित आघाडी स्वबळावर निवडणुकांना सामोरे जाईल, असेही आंबेडरकरांनी स्पष्ट केले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT