Prakash Ambedkar
Prakash Ambedkar Sarkarnama
मुंबई

Prakash Ambedkar : 'शिवशक्ती-भीमशक्ती' एकत्र येणार? ठाकरे-आंबेडकर यांची फोनवर चर्चा!

सरकारनांमा ब्यूरो

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय समीकरण जुळून येण्याची शक्यता दिसत आहे. राज्याच्या राजकारणाला पूर्णपणे कलाटणी देणारी राजकीय घडामोड समोर येत आहे. वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना ठाकरे गट यांचं राजकीय सूत जुळणार अशी चर्चा होत आहे. वंचित आघाडीचे सर्वेसेवा प्रकाश आंबेडकर (prakash ambedkar) यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. दोन्ही नेते लवकरच भेटणार असल्याचीही चर्चा आहे.

आंबेडकर आणि ठाकरे यांनी फोनवर वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेच्या एकत्र येण्यावर बोलणं झालं असल्याचे समजते आहे. 20 किंवा 21 तारखेच्या दरम्यान आंबेडकर हे उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचीही चर्चा होत आहे. यामुळे आता राज्याच्या राजकारणात नवं समीकरण जुळून येण्याची चिन्हे दिसत आहेत. खुद्द प्रकाश आंबेडकरांनीच यापूर्वीही अनेकवेळा उद्धव ठाकरेसोबत आघाडी करण्याचे बोलले आहेत.

शिवसेनेतल्या अभूतपूर्व फुटीनंतर राज्यातील राज्यातली राजकीय परिस्थिती ढवळून निघाली. सत्तांतर घडून आले. यामुळे शिवसेनेला पुन्हा उभारी देण्यासाठी आणि शिंदे-भाजवर मात करण्यासाठी उद्धव ठाकरे ही आघाडी करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेसोबतच काँग्रेसबरोबरही आघाडीची करण्याची तयारी यापूर्वीही दर्शवली आहे. मात्र काँग्रेसकडून अजूनही प्रतिसाद आलेले नाही. यात विशेष बाब म्हणजे आंबेडकर यांनी महाविकासआघाडीत प्रमुख घटक असलेल्या राष्ट्रवादीला मात्र जाहीरपणे आघाडीसाठी कोणताही प्रस्ताव दिलेला नाही. यामुळे आंबेडकरांना राष्ट्रवादीचे वावडे का आहे? अशी चर्चा होत आहे.

शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र यावी ही बाळासाहेब ठाकरेंची इच्छा होती. मात्र भाजप - शिवसेना युती तुटल्यानंतर आरपीआय आठवले गटाचे नेते रामदास आठवले भाजपसोबत गेले. मात्र आता वंचितच्या रूपाने एक आंबेडकरी विचारधारा शिवेसेनेसोबत येत असल्याने, एकप्रकारे बाळासाहेबांचीच इच्छा पूर्ण होत असल्याचे बोलेले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT