Former MNS spokesperson Prakash Mahajan meets Maharashtra Deputy CM Eknath Shinde in Thane ahead of his Shiv Sena party entry. Sarkarnama
मुंबई

Maharashtra Politics : हिवाळी अधिवेशना दरम्यान फडणवीसांची भेट, पण प्रवेश शिंदेंच्या शिवसेनेत; मनसेला रामराम केलेल्या महाजनांनी अखेर आपला मार्ग निवडला

Prakash Mahajan Shiv Sena Entry : 'माझा थोडं वय वाढलं असून काही गोष्टी मनाविरुद्ध घडतात. त्यामुळे मी पक्षातून बाहेर पडलो आहे. माझा बाकी कोणावर राग नसल्याचं स्पष्ट केलं होतं. शिवाय मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा माणूस असून मी ते कधीही लपवलं नाही, मी राज ठाकरेंना घाबरत नाही.'

Jagdish Patil

Mumbai News, 26 Dec : राज ठाकरेंच्या मनसेतून बाहेर पडलेले जेष्ठ नेते प्रकाश महाजन पुढे काय भूमिका घेणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. शिवाय त्यांनी नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.

त्यामुळे ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा देखील रंगल्या होत्या. मात्र, आता या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. कारण अखेर प्रकाश महाजन यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

प्रकाश महाजन यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी शिंदेंच्या शिवसेना पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केल्याचं सांगितलं जात आहे. त्यानुसार आज दुपारी ठाण्यात महाजन शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत.

त्यामुळे आता एकीकडे ठाकरे बंधुंच्या युतीची घोषणा झाल्यानंतरही भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. प्रकाश महाजन हे मनसेचे प्रवक्ते होते. मात्र, पक्षातील अंतर्गत वादामुळे त्यांनी 13 सप्टेंबर रोजी पक्ष सोडला. त्यांच्या जाण्यामुळे मनसेला मोठा धक्का बसल्याचं बोललं जात होतं.

'माझा थोडं वय वाढलं असून काही गोष्टी मनाविरुद्ध घडतात. त्यामुळे मी पक्षातून बाहेर पडलो आहे. माझा बाकी कोणावर राग नसल्याचं स्पष्ट केलं होतं. शिवाय मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा माणूस असून मी ते कधीही लपवलं नाही' असं म्हणतच संघा संदर्भात बोलताना मी राज ठाकरेंना घाबरत नाही, असंही महाजन यांनी म्हटलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT