Praniti Shinde
Praniti Shinde  
मुंबई

राहुल गांधींना क्रुरपणे छळण्याचा भाजपचा प्रयत्न... ; प्रणिती शिंदेंचा भाजपला इशारा

सरकारनामा ब्युरो

मुंबई : गेल्या तीन-चार दिवसांपासून कॉंग्रेस (Congress) पेटून उठली आहे. भाजपकडून ईडीच्या माध्यमातून दबावाचं, छळवणूकीचं राजकारण सुरु आहे. खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा छळ सुरु आहे. कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) आजारी असतानाही कोणतीही माणूसकी न दाखवता राहुल गांधींना त्यांचा क्रुरपणे छळायचा प्रयत्न सुरु आहे. जे प्रकरण २०१५ मध्येच बंद करण्यात आले ते पुन्हा उकरुन काढून त्यावरुन राहुल गांधींना त्रास देण्याचा प्रकार सुरु आहे. अशी प्रतिक्रिया कॉंग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी दिली आहे. (Congress Protest latest news update)

सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीची नोटीस आल्यापासून देशभरात ठिकठिकाणी कॉंग्रेस आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधींच्या ईडीच्या चौकशी विरोधात काँग्रेसकडून सर्वच जिल्ह्यात आंदोलन करण्यात आलं. यावेळी अनेक ठिकाणी पोलीस आणि आंदोलक आमने सामने आल्याचे पाहायला मिळाले. या सर्व घटना क्रमावर प्रणिती शिंदे यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.

'दिवंगत अटलबिहारी वाजपेयी ज्यावेळी आजारी होते, तेव्हा तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी त्यांना परदेशत उपचारासाठी पाठवले होते. ही कॉंग्रेसची माणूसकी होती. पण आज भाजप ईडीच्या माध्यामातून दबावाचं आणि छळवणूकीचं राजकारण करत आहे. तीन तासांच्या चौकशीसाठी तेरा-तेरा तास बसवुन ठेवले जाते. अशा प्रकारे भाजप एकदम खालच्या लेवलचं राजकारण करत आहे. मोठमोठ्या नेत्यांवर दबाव आणून त्यांच्यावर ईडीची चौकशी लावली जात आहे. हे नेते भाजपमध्ये गेले की त्यांच्यावर सुरु असलेली ईडीची कारवाईसुद्धा बंद होऊन जाते.'

'आज देशभरात निषेध करणाऱ्या आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांची धरपकड केली जात आहे. त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. त्यांना तुरुंगात टाकले जात आहे, या सर्वांचा आम्ही तीव्र निषेध करतो. जोपर्यंत राहुल गांधीना बोलवल जाईल, खोटे गुन्हे दाखल करुन आणखी काय करतील याचा आम्हाला अंदाज नाही, हे फक्त कॉंग्रेसलाच नाही तर आता सर्वसामान्य माणसालाही कळलं आहे. पण आता हे स्पष्ट आहे हे केवळ दबावाचं राजकारण सुरु असल्याचा' आरोप आमदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT