Raj Thackeray
Raj Thackeray sarkarnama
मुंबई

Raj Thackeray : मी, फडणवीस, सीएम एकत्र बघून लोकांना वाटेल एकावर एक फ्री आहे का ?

सरकारनामा ब्युरो

Raj Thackeray : अभिनेते प्रशांत दामले (prashant damle) यांनी त्यांच्या कारकीर्दीमधला 12 हजार 500 वा नाट्यप्रयोग काल (रविवारी) मुंबईतील ष्णमुखानंद सभागृहात सादर केला. यावेळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या कार्यक्रमात शिंदे-ठाकरे यांनी जोरदार फटकेबाजी केली.

काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी भेट होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात महायुतीच्या चर्चाही रंगत आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी टोलेबाजी केली.

"प्रशांत दामलेंच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येऊन गेले. त्यांचे आणि आमचे आधी कार्यक्रम एकत्र झाले. मला असे वाटले की, या कार्यक्रमाला येऊ की नको. कारण लोकांना वाटायचे की, एकावर एक फ्री मिळतेय का? आम्ही दीपोत्सवाला एकत्र होतो. लोकांना वाटणार की, हे आले म्हणजे ते येणार," असा टोला राज ठाकरे यांनी हाणला.

"आपल्याकडे कलाकारांना महत्त्व दिले जात नाही. आपल्याकडे जेवढ्या प्रतिमा जपल्या जातात तेवढ्या प्रतिभा जपल्या जात नाहीत. त्यामुळे आपल्याकडे पूल, शाळा आणि रस्त्याला नावे द्यायला तीस-तीस लोक आठवतात. तसेच निवडणुकीनंतर लोक जे म्हणतात ते आज आम्ही म्हणणार आहोत. आमच्या हाती काय आले, तर घंटा. पण घंटा-घंट्यातील फरक आहे. ही वाजवायची घंटा आहे. ती नाटकाची आहे. सध्या आशीर्वाद देण्यासाठी मोठे व्यक्ती राहिले नाही," असे राज ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "मी प्रशांत दामलेंएवढा फेमस नाही. साडेतीन महिन्यांपूर्वी आम्ही एक महानाट्य केले. त्याचे पडसाद आजही राज्यात, देशात अन् जगभरात उमटत आहेत. तेव्हा मी थोडा फेमस झालो होतो,"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT