मुंबई : मुंबै जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीत भाजपने यश मिळविले आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी एकहाती सत्ता मिळवली आहे. दरेकर यांच्या सहकार पॅनेलने सर्व २१ जागांवर विजयी झाले आहेत. तर यातील १७ जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. आता बॅंकेच्या अध्यक्ष- उपाध्यक्ष निवडणुकीसाठी शिवसेना अन् राष्ट्रवादी कॉग्रेस युती करण्याच्या तयारीत आहेत.
गुरुवारी राष्ट्रवादी कॉग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांची सह्याद्री अतिगृहावर बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या सूचनेनुसार शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉग्रेसच्या मुंबै बॅंकेतील प्रतिनिधीची एकत्र बैठक झाली. या बैठकीला शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकरही उपस्थित होते.
बैठकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर दोन्ही पक्षांनी मुंबई बँकेवरील भाजपचं वर्चस्वाला धक्का देत सत्ता परिवर्तन करण्याची रणनिती आखली. त्यानुसार मुंबई बँकेवर अध्यक्षपदी सिद्धार्थ कांबळे तर उपाध्यक्षपदी अभिषेक घोसाळकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे. शिवसेना आमदार सुनिल राऊत आणि शिल्पा सरपोतदार यांना महत्वाची जबाबदारी मिळणार असल्याचीही माहिती आहे.
..तरीही दरेकरांना अध्यक्षपदावरुन पायउतार व्हावे लागणार
सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे ११ संचालक आहेत, तर भाजपचे ९ संचालक आहेत. असे मुंबै बँकेचं सत्ता समिकरण असल्यामुळे विद्यमान अध्यक्ष आणि भाजपचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांना मुंबै बँकेच्या अध्यक्ष पदावरून आता पायउतार व्हावे लागणार हे स्पष्ट झालं आहे.
मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक म्हणजेच मुंबै बँकेची पंचवार्षिक (२०२१-२६) निवडणूक नुकतीच झाली. या निवडणुकीत आमदार व विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मजूर व नागरी बॅंक या प्रवर्गातून अर्ज दाखल केला. या दोन्ही प्रवर्गातून ते बिनविरोध निवडून आले. मुळात आमदार व विरोधी पक्षनेता म्हणून आर्थिक लाभ घेत असताना ती व्यक्ती ‘मजूर’ असू शकत नाही. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात स्वतंत्र व्यावसायिक असे नमूद केलेले असताना ती व्यक्ती मजूर कशी होऊ शकते? त्यामुळेच दरेकर यांना जिल्हा सहनिबंधक बाजीराव शिंदे यांनी अपात्र घोषित केले.
राणेंची खेळी! संतोष परब हल्ला प्रकरणातील आरोपीच बसवला जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी
मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या (Sindhudurg District Bank Election) अध्यक्षपदी भाजपचे (BJP) मनीष दळवी तर उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर यांची निवड झाली आहे. दळवी हे केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचे निकटवर्तीय मानले जातात. विशेष शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणात दळवी हे आरोपी आहेत.
संतोष परब हल्ला प्रकरणात राणेंचे पुत्र आमदार नितेश राणे अडचणीत आले आहेत. त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.