Dawood Ibrahim, pravin darekar
Dawood Ibrahim, pravin darekar sarkarnama
मुंबई

दाऊदचा राजीनामा घेण्यासाठी जमलात, त्याबद्दल आभार ; दरेकरांना मलिकांचा विसर

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. मलिकांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपने महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरलं आहे. आज भाजपने मलिकांच्या राजीनाम्यासाठी आझाद मैदानावर मोर्चा (bjp morcha)काढण्यात आला.

यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (pravin darekar)यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं. राज्य सरकारवर त्यांनी गंभीर आरोप केले. ''मला या ठाकरे सरकारची लाज वाटत आहे. ठाकरेंना विचारु इच्छितो तुमचा ठाकरी बाणा कुठे गेला,'' असा सवाल प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

''बाळासाहेबांच्या सुपूत्रांना विचारु इच्छितो की, तुमचा ठाकरी बाणा कुठे गेला. ज्या दाऊदच्या सहकाऱ्याने बॉम्बस्फोट केला. त्या बॉम्बस्फोटातील आरोपींची जागा नवाव मलिक खरेदी करतात. तो देशविरोधी कटात असल्याचं सिद्ध होतं. न्यायालयाच्या आदेशाने तो तुरूंगात आहे", असे दरेकर म्हणाले.

दरेकर म्हणाले, "महात्मा गांधींनी आयुष्यभर अहिंसेचा पुरस्कार केला. त्यांच्या पुतळ्यासमोर अख्खं सरकार देशद्रोह्याला पाठिशी घालण्यासाठी बसतं. लाजा पण वाटत नाही. उपमुख्यमंत्री बसतात. गृहमंत्री बसतात. आमचे महात्मा गांधी असते, तर शिक्षा दिली असती"

नवाब मलिकांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला हे दरेकर भाषणाच्या शेवटी विसरून गेले. भाषणाच्या शेवटी दरेकर म्हणाले, ''आपण लाखोच्या संख्येनं रोष व्यक्त करण्यासाठी आणि दाऊदचा राजीनामा मागण्यासाठी जमलात त्याबद्दल आभार व्यक्त करतो," हे वाक्य कानी पडताच उपस्थितांनी आश्चर्य व्यक्त केलं.

आझाद मैदानापासून निघालेला हा मोर्चा जवळच असलेल्या मेट्रो सिनेमा या ठिकाणी अडविण्यात आला. पोलिसांनी मोर्चकऱ्यांना रस्त्यातच अडवलं. चंद्रकांत पाटील, नितेश राणे, प्रविण दरेकर, किरीट सोमय्या यांचा समावेश आहे. या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना पोलिस ठाण्यात नेले आहे. ''पोलिसांनी आम्हाला दरोडेखोरांसारखं फिरवलं,'' असे दरेकरांनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT