Dilip Lande Sarkarnama
मुंबई

Dilip Lande: काय सांगता! शिवसेनेच्या आमदारानं 600 रूपयांचा प्रेशर कुकर अडीच हजाराला केला खरेदी; काय आहे प्रकरण?

Pressure Cooker Scam Petition filed against MLA Dilip Lande:मुंबई महापालिकेच्या (BMC) अधिकाऱ्यांनी हे प्रेशर कूकर खरेदीसाठी टेंडर काढले होते. हे कूकर वाढीव भावात खरेदी करण्यात आले. तेही निकृष्ट दर्जाचे होते असा आरोप करण्यात आला आहे.

सरकारनामा ब्यूरो

महिला सक्षमीकरण योजनेत काही दिवसांपूर्वी आमदार दिलीप लांडे (Dilip Lande) व त्यांच्या सहकाऱ्यांनी चांदिवली, साकीनाका विभागातील महिलांना प्रेशर कूकरचं वाटप केलं होतं. मतदारसंघात वाटप केलेल्या 50 हजार प्रेशर कुकर खरेदीत मोठा आर्थिक घोटाळा (Pressure Cooker Scam) केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आमदार लांडे यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

सामाजिक कार्यकर्ता अ‍ॅडव्होकेट निखिल कांबळे यांनी ही याचिका दाखल केली आहे. याचिकेवर लवकरच सुनावणी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. 600 रूपयांचे प्रेशर कुकर 2 हजार 498 रूपयांना खरेदी करीत आमदार दिलीप लांडे यांनी 12 कोटी 50 हजारंचा खर्च दाखवल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आला आहे.

आमदार दिलीप लांडे आणि पालिका एल वॉर्डाचे सहाय्यक आयुक्त धनाजी हिर्लेकर यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी निखिल कांबळे यांनी केली आहे. मुंबई महापालिकेच्या (BMC) अधिकाऱ्यांनी हे प्रेशर कूकर खरेदीसाठी टेंडर काढले होते. हे कूकर वाढीव भावात खरेदी करण्यात आले. तेही निकृष्ट दर्जाचे होते असा आरोप करण्यात आला आहे.

'एल वॉर्डच्या अधिकाऱ्यांनी एका खासगी कंत्राटदाराकडून ४१ हजार प्रेशर कूकर टेंडर काढून खरेदी केले. आर्थिक दुर्बल घटकातील व दारिद्र रेषेखालील महिलांना या प्रेशर कूकरचं वाटप करण्याचा हेतू होता. मात्र, बाजारात प्रत्येकी १५४५ रुपये भाव असलेले हे कूकर प्रत्यक्षात २,४०० रुपयांत खरेदी करण्यात आले, असं निखिल कांबळे यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT