sanjay raut, narendra modi Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut : ''पंतप्रधान मोदींनी मुंबईत घर घ्यावं; राजभवनात राहावं,पण मुंबई महापालिका त्यांना मिळणार नाही...!''

Pm Narendra Modi Mumbai Visit: कारण पंतप्रधानांनाच मुंबई महापालिका जिंकायची आहे...

सरकारनामा ब्यूरो

Sanjay Raut On Narendra Modi Mumbai Visit: पंतप्रधान नरेद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यावरुन राजकीय वातावरण तापलं आहे. भाजप आणि शिंदेगटात पंतप्रधान मोदी मुंबईत येत असल्यामुळे उत्साहाचं वातावरण आहे. तर ठाकरे गटाच्या नेत्यांकडून मोदींसह भाजपवर निशाणा साधला आहे. खासदार संजय राऊत यांनीही पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौर्यावरुन बोचरी टीका केली आहे.

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मोदींचा मुंबई दौरा, बच्चू कडू यांचा दावा यांसारख्या विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. राऊत म्हणाले, जोपर्यंत महापालिका निवडणुका होत नाही, तोपर्यंत मोदींचा मुक्काम मुंबईत राहू शकतो. कारण मुंबई महापालिका जिंकण्यासाठी स्थानिक भाजप व मिंधे गटाचे नेते असमर्थ आहेत. पण मोदी जरी आले, अख्खा देश जरी इथे लावला जसा इतर राज्यात लावला तरीही मुंबई महापालिका ते जिंकू शकत नाही. त्याचमुळे मोदींचा पत्ता सारखा टाकला जात आहेत असं राऊत म्हणाले.

लोकसभेत संसद अधिवेशन सुरु असताना, अदानींवरुन दोन्हीही सभागृहात विरोधी पक्षांनी घेरलेलं असताना, विविध प्रश्न प्रलंबित असताना, विरोधकांच्या आरोपांना कोणतंही उत्तर न देता पंतप्रधान मोदी (Narendra Modi) मुंबईत येत आहेत. वंदे मातरम हे निमित्त आहे. कारण पंतप्रधानांनाच मुंबई महापालिका जिंकायची आहे हे फार महत्वाचं आहे. पण तरीही मुंबई महापालिका जिंकता येणार नाही. मुंबई महापालिका ही शिवसेनेचीच राहणार असल्याचा दावा केला आहे.

मोदी हे देशाचे पंतप्रधान आणि त्यांचं लक्ष मुंबई महानगरपालिकेवर आहे. याचा अर्थ इथले सगळे भाजपा आणि मिंधे गटाचे नेते नाकर्ते आहेत. म्हणून पंतप्रधानांना बोलवलं आहे. कदाचित पंतप्रधान पालिका निवडणूक जिंकेपर्यंत मुंबईत घर घेऊन राहतील. पंतप्रधान मोदींनी मुंबईत यावं, घर घ्यावं, राजभवनात राहावं पण आम्हीही तयार आहोत. त्यांना मुंबई महापालिका जिंकता येणार नाही असा टोलाही संजय राऊतांनी (Sanjay Raut) मोदींना लगावला आहे.

राहुल गांधींसह विरोधकांनी प्रश्न सोपे विचारले होते. प्रश्नपत्रिका सोपी होती. त्याचे उत्तर का दिलं नाही? अशी विचारणाही राऊतांनी यावेळी केली. तसेच अदानी मुद्द्यावरून मोदी मौन आहेत. ते उत्तरं देत नाहीत. विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात पंतप्रधानांसमोर गोंधळ घातला. त्यांचं भाषण होऊ दिलं नाही. पण पंतप्रधान बोलतच होते. विरोधी पक्षाने प्रश्न उपस्थित केले. त्यावर मोदींनी उत्तर का दिलं नाही? असा सवालही राऊतांनी यावेळी उपस्थित केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT