BJP Sarkarnama
मुंबई

Atal Setu News : अटलसेतूच्या उद्घाटनासाठी भाजप कार्यकर्त्यांच्या गर्दीचं लक्ष्य

सरकारनामा न्युज ब्युरो

भाग्यश्री प्रधान-आचार्य

Dombivli Political News :

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. नाशिकमधील राष्ट्रीय युवा दिनाच्या कार्यक्रमानंतर ते मुंबईत येणार आहे. यावेळी ते शिवडी-न्हावाशेवा समुद्रपूल म्हणजे अटल सेतूचे उद्घाटन (Mumbai Trans Harbour Link Inauguration) करणार आहेत.

विशेष म्हणजे भारतातील सर्वात लांब समुद्रपुलाचे उद्घाटन याची देही याचि डोळा पाहता यावे, या ऐतिहासिक घटनेचे त्यांना साक्षीदार होता व्हावे, यासाठी भाजपच्या कल्याण जिल्ह्यातील म्हणजेच कल्याण, डोंबिवली, भिवंडी, मुरबाडमधून हजारो भाजप कार्यकर्त्यांना मुंबईतील या उद्घाटनस्थळी नेण्याची व्यवस्था भाजपने केली आहे.

भाजपने कल्याण जिल्ह्यातून तब्बल 230 बसमधून कार्यकर्ते कार्यक्रमस्थळी पाठवले आहेत. पंतप्रधान मोदी नाशिकमधून मुंबईत येणार आहेत. इथे ते अटलसेतूचे उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर नवी मुंबईतील कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.

शिवडी-न्हावाशेवा अटलसेतू हा देशातील सर्वात मोठा समुद्रपूल आहे. तब्बल २१.८ किलोमीटर लांबीचा पूल देशाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. केवळ सहा वर्षांत या पुलाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. अटलसेतूमुळे महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला मोठा हातभार लागेल, असे सांगितले जाते. त्यामुळे याकडे महाराष्ट्राचे भविष्य म्हणून पाहिले जाते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

डोंबिवलीचे आमदार आणि मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan), केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील (Kapil Patil) आणि मुरबाडचे आमदार किसन कथोरे (Kisan Kathore) यांनी कार्यकर्त्याच्या 230 गाड्यांसाठी पुढाकार घेतला. यातील 16 बसेस डोंबिवलीतील सोडण्यात आल्या आहेत. या सर्व कार्यकर्त्यांची बसमध्येच फूड पॅकेट आणि पाण्याची सोय करण्यात आली आहे.

आगामी लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर येणारी विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन कार्यकर्त्यांना खूश करण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आल्याची चर्चा आहे. शिवाय कार्यक्रमस्थळी गर्दी जमवण्याचे लक्ष्य असल्यामुळे अनेक ठिकाणांहून हजारो भाजप कार्यकर्ते पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमस्थळी रवाना झाले आहेत.

(Edited by Avinash Chandane)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT