विंग (ता. कऱ्हाड) : राजकीयदृष्ट्र्या लक्ष लागून राहिलेल्या विंग ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व अतुल भोसले गटाच्या सत्ताधारी हनुमान ग्राविकास पॅनेलने १५ पैकी १० जागांवर विजय मिळवत वर्चस्व कायम राखले आहे. तर विरोधातील उंडाळकर गटाच्या रयत विकास आघाडीला केवळ पाच जागावर समाधान मानावे लागले. विजयानंतर सत्ताधारी गटाच्या कार्यकर्त्यानी गुलालाच्या उधळणीत जल्लोष व्यक्त केला.
विंग येथील ग्रामपंचायतीच्या १५ जागांसाठी शुक्रवारी चुरसीने मतदान झाले. पारंपारिक प्रतिस्पर्धी ज्येष्ठ नेते (कै.) विलासराव पाटील-उंडाळकर गटाच्या रयत विकास आघाडी विरूध्द आमदार पृथ्वीराज चव्हाण अणि अतुल भोसले यांना मानणाऱ्या सत्ताधारी श्री हनुमान ग्रामविकास पॅनेलमध्ये चुरस झाली. वार्ड फेररचना, अपक्षांमुळे यंदाच्या निवडणुकीत वेगळीच रंगत आली होती.
विजयाचे पारडे कोणाकडे फिरणार यातच चुरस होती. त्यात भोसले गटाचे काही कार्यकर्ते रयत आघाडी समवेत होते. त्यामुळे निवडणुकीकडे लक्ष लागले होते. अटातटीच्या लढतीत सत्ताधारी आमदार चव्हाण व भोसले यांच्या समर्थकांच्या हनुमान ग्रामविकास पॅनेलच्या उमेदवारांनी बाजी
मारत बहुमत सिद्ध केले. त्या पॅनेल १० उमेदवार विजयी झाले. त्यामुळे सत्ताधारी गटाने पुन्हा वर्चस्व सिध्द केले.
जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले अणि माजी सरपंच बबनराव शिंदे यांनी पॅनेलचे नेतृत्व केले. सत्ताधारी विजयी उमेदवारानी गुलालाच्या उधळणीत जल्लोष व्यक्त केला. येथील वार्ड क्रमांक तीनचे नागरीकांचा मागास प्रवर्गातील उमेदवार विठ्ठल राऊत यांनी पाचव्यांदा ग्रामपंचायत निवडणुक लढवली. पाचहीवेळी ते विजयी ठरले आहेत. ग्रामपंचायत उपसरपंच अणि सेवा सोसायटी सदस्य तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून काम त्यांनी पाहिले आहे.
विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते : ग्रामिवास पॅनेल - संतोष दत्तात्रय पाटील (367) सचिन उर्फ प्रदीपकुमार पाचुपते (374), विठ्ठल राऊत (496) संजय खबाले-पाटील (369) प्रियांका कणसे (331) शुभांगी खबाले (458) दिपाली पाटील (439) शंकर ढोणे (386), अलका पवार (407), साधना कणसे (433) रयत आघाडी पॅनेल - विजया कचरे (326) विकास माने (490) पूनम डाळे (480) अश्विनी माने (464) बाबूराव खबाले (438).
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.