Maharashtra politics : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सातत्याने धक्के बसत आहेत. लोकसभेतील सहा खासदारांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर विधानपरिषदेतील आमदार सचिन अहिर यांनीही शिंदेंची साथ देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता पक्षाच्या नेत्या माजी खासदार प्रियांका चतुर्वेदी याही राजकारणातून निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चांना सोशल मीडियात उधाण आले आहे.
प्रियांका चतुर्वेदी हा राज्यसभेच्या माजी खासदार आहेत. त्यांना पुन्हा उमेदवारी न मिळाल्याने त्यांची राज्यसभेची संधी हुकली. मात्र, त्यांनी आता आपल्या आयुष्यात नवी सुरूवात केली आहे. भाजपचे खासदार नवीन जिंदाल यांच्या शैक्षणिक संस्थेत त्यांनी अध्यापनाचा मार्ग निवडला आहे. हरियाणातील सोनीपत येथील ओ. पी. जिंदाल विद्यापीठामध्ये त्यांनी अध्यापनाचे काम सुरू केले आहे.
नव्या सुरूवातीबाबत प्रियांका चतुर्वेदी यांनी सोशल मीडियातून माहिती दिली आहे. यामध्ये त्यांनी राजकारण सोडणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे. मात्र, त्यानंतरही सोशल मीडियात चर्चांना उधाण आले आहे. प्रियांका चतुर्वेदी यांनी राजकारणातून संन्यास घेतला, अशा आशयाच्या 'एक्स'वरील एका पोस्टला त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
माजी खासदार चतुर्वेदी यांनी म्हटले आहे की, राजकारणातून संन्यास? स्वप्नातही नाही! २० वर्षांची मेहनत आणि हिंमतीने मिळविलेल्या स्थानावरून निवृत्ती तर लांबची गोष्ट आहे. राजकारणात लढाई सुरूच राहील. संसदेत टिकून राहण्याच्या आजच्या चढाओढीच्या विपरीत भारताच्या विकासात हातभार लावण्याचा माझा प्रयत्न आहे. माझी बदनामी करणाऱ्या अशा सर्व लोकांसाठी ही चपराक असल्याचे चतुर्वेदी यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
देशासाठी योगदान देण्याचे मार्ग केवळ राजकारण नाही
'लिंक्डइन'वर केलेल्या पोस्टमध्ये प्रियांका चतुर्वेदी यांनी म्हटले आहे की, राजकारणात दोन दशकांहून अधिक काळ काम केले आहे. त्यामुळे मी राजकारण सोडणार नाही, हे स्पष्ट करू इच्छिते. पण, स्वच्छ आणि पारदर्शक राजराजकारणासाठीचा प्रवास सुरू ठेवतानाच, देशासाठी योगदान देण्याचे मार्ग केवळ राजकारणापुरते मर्यादित नसतात, याचीही जाणीव आहे. माझ्या अनुभवांचा उपयोग करून भारताच्या पुढील पिढीतील नेतृत्व घडविण्याचा निर्णय घेतला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.