Priytama Muthe
Priytama Muthe  Sarkarnama
मुंबई

Priytama Muthe News : मिसेस महाराष्ट्र स्पर्धेच्या विजेत्या, धडाकेबाज पोलीस अधिकारी अन् सामाजिक कार्यातही सहभाग!

सरकारनामा ब्यूरो

Priytama Muthe News : एक महिला पोलीस अधिकारी पोलीस म्हणून कर्तव्य बजावत असताना, समाजाप्रति बांधिलकी म्हणून, आपण समाजाचं देणं लागतो या उदात्त भावनेने समाजिक कार्य करण्याची जबाबदारी, त्या पार पाडताना दिसतात. प्रियतमा बाळासाहेब मुठे या ठाणे शहर पोलिस स्थानकात पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत आहेत. पोलीस म्हणून काम करताना, त्यांना सामाजिक कार्याचीही जबाबदारी त्या पार पाडत असतात.

प्रियतमा यांचा पोलिस खात्यातील नोकरीचा, त्यांच्या शिक्षणाचा उपयोग समाजासाठी व्हावा, यासाठी त्यांचा सतत प्रयत्न असतो. अनाथ मुला-मुलींसाठी शिक्षणाचं कार्य करायचा आपली इच्छा असते, असे ते बोलून दाखवतात. अशा मुला-मुलींसाठीच्या शैक्षणिक कार्यासाठी नेहमी आर्थिक साहाय्य मी करत असते. तसेच, ज्या महिला अडी-अडचणीत आहेत, ज्या महिलांना संरक्षणाची गरज आहे, ज्यांना कायद्याची गरज आहे, अशा महिलांनाही माझा मदत करण्याचा प्रयत्न असतो, असे त्या म्हणतात.

समाजातील गुन्हेगारी नष्ट होण्यासाठी, वाढलेली गुन्हेगारी काही प्रमाणात का होईना, ती कमी करण्यासाठी गुन्हेगारांना समुपदेशन, गुन्हेगारी पासून परावृत्त करणे, त्याचं पुनर्वसन करून सामाजिकीकरण करण्याचं त्यांचा ओढा आहे. यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात.

प्रियतमा बाळासाहेब मुठे या पोलीस म्हणून कार्यरत आहेत. तसेच त्यांनी २०१९ मध्ये परफेक्ट मिसेस महाराष्ट्र स्पर्धेत्या त्या विजेत्या आहेत. २०२१ मध्ये पॅसिफिक इंडिया इंटरनँशनल मिसेस इंडिया या स्पर्धेची देखील त्या महाविजेती आहेत. दुबई येथे झालेल्या मिसेस युनिव्हर्स ही स्पर्धासुद्धा त्यांनी जिंकली आहे. पोलिस, सौंदर्य़स्पर्धा ते सामाजिक कार्य अशी मुठे यांची मुशाफिरी आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT