पुणे : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय गुप्तचर तपास यंत्रणेकडून (NIA) टेरर फंडिंगबाबत कसून तपास केला जात आहे आहे. या तपासाला आता वेग आला आहे. त्यामुळे पीएफआय (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया)चं धाबं दणाणलं आहे.
एनआयएची देशभर मोठी कारवाई सुरु आहे. आतापर्यंत देशभरातून 100हून अधिक जणांना NIAकडून अटक करण्यात आली. पुण्यातून कयूम शेख आणि रझी अहमद खान या दोघांना अटक केली आहे.
टेरर फंडिंगप्रकरणी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) संघटनेशी संबंधित कार्यालय, व्यक्ती आणि महत्वपूर्ण ठिकाणांवर गुरुवारी पहाटे राष्ट्रीय गुप्तचर तपास यंत्रणा (एनआयए) आणि स्थानिक पोलिसांनी छापे टाकले.
niaच्या छापेमारीत महाराष्ट्रातील 20 जणांना अटक करण्यात आली आली आहे. छाप्यामध्ये मोठ्या प्रमाणात महत्त्वपूर्ण कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक डाटा जप्त करण्यात येत आहे. महाराष्ट्रात नवी मुंबई, भिवंडी, पुणे, नाशिक, कोल्हापूर, परभणी, औरंगाबाद, नांदेड, बीड, जालना, मालेगावसह आदी ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे.
पुण्यात एनआयएने विविध ठिकाणी छापेमारी केली आहे. या प्रकरणात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे कोंढवा भागातील कार्यकर्ते रजी खान यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. यासंदर्भात शहरात नेमके कुठे, कुठे तपास यंत्रणांनी छापेमारी केली आहे आणि कोणाला ताब्यात घेतले आहे, याबाबतची लवकरच समजेल.
पुण्यातील कोंढवा येथे pfiचे कार्यालय आहे. एटीएस आणि एनआयएचे टीम एकत्रित पणे हा तपास करीत आहे. कोंढवा परिसरातील उर्दू आणि इंग्रजी शाळांच्या इमारतीमध्ये pfi बैठका पार पडत होत्या, अशी प्राथमिक माहिती आहे.
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया च्या दोन जणांना NIA ने परभणीतून उचलले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.त्याना नांदेडला नेण्यात आल्याची माहिती आहे. शहरात त्यांचं अधिकृत कार्यालय नाहीय , घरातून यांचा कारभार चालतो, असे समजते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.