Uddhav Thackeray and Droupadi Murmu Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray : 'शक्ती' कायद्यावरील धूळ झटका; उद्धव ठाकरेंचे राष्ट्रपतींना आवाहन

Uddhav Thackeray appeals to President Droupadi Murmu for Shakti Act : बदलापूर अत्याचार घटनेचा निषेध करताना उद्धव ठाकरे यांनी 'शक्ती' कायद्याच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आवाहन केलं.

Pradeep Pendhare

Mumbai News : बदलापूर अत्याचार घटनेवरून महायुती सरकारला भित्रट म्हणत, उद्धव ठाकरेंनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना देखील आवाहन केलं.

"आपण एक महिला आहात. राष्ट्रपती देखील आहात. आपण तो शक्ती कायदा केला होता, तो आणावा. गेल्या अडीत वर्षांपासून जो कायदा आपल्या दप्तरी धूळखात पडून आहे, त्यावर धूळ झटकावी आणि तो अंमलात आणा", असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले.

बदलापूर अत्याचाराच्या घटनेच्या निषेध नोंदवण्यासाठी महाविकास आघाडी संपूर्ण राज्यात रस्त्यावर उतरली. शरद पवार (Sharad Pawar) आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात निषेध आंदोलन झाले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत आंदोलन झाले. उद्धव ठाकरे यांनी आंदोलनात महायुती सरकारला भित्रट म्हणत, जोरदार टीका केली.

"राज्यात रोज कोठे कोठे महिलांवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत. यातून महायुती सरकार निर्ढावलेले आहे. त्यामुळे राज्यातील माझ्या माता-बहिणींना न्याय मिळत नाही. महिलांवर अत्याचारात आरोपींना कडक शिक्षेसाठी 'शक्ती' कायदा आणला होता. आपणच तो कायदा आणल होता. त्याची देखील अंमलबाजवणी झालेली नाही. गेल्या अडीच-तीन वर्षांपासून हा कायदा राष्ट्रपती भवनात धूळखात पडून आहे", असे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सांगत सरकारला फटकारले.

उद्धव ठाकरे म्हणाले, "शक्ती कायदा केला होता. राष्ट्रपती देखील महिला आहेत. आपणच तो पाठवला होता. त्या कायदा दोन-तीन वर्षांपासून राष्ट्रपतींच्या दप्तरी पडला आहे. त्यावरील धूळ झटकावी, माता भगिणींच्या सुरक्षितेसाठी हा कायदा अंमलात आणा. त्यावरील धुळ झटका आणि तो अंमलात आणा”.

महाराष्ट्र साधूसंताचा आहे. फुले-शाहू-शिवाजी महाराज आणि आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. ही नावे तोंडी लावायला घेत नाही, आम्ही. हा संस्कारीत महाराष्ट्र आहे. एका बाजूला संस्कृती आहे, तर दुसऱ्या बाजूला विकृत आणि नराधम आहेत. त्यावर पांघरून घालणारं विकृत सरकार आहे. त्यांच्याविरोधातील हा लढा आहे. आता जाग आली आहे, तर जागे राहा. आई, बहीण, मुलींच्या संरक्षणासाठी जागे राहा, हा लढा विझू देवू नका. तो पुढे पेटताच राहिला पाहिजे, असे सांगून स्वाक्षरी मोहिमेची घोषणा उद्धव ठाकरेंनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT