Amitabh Gupta sarkarnama
मुंबई

PUNE POLICE : अबतक 100 ; अमिताभ गुप्तांनी 'मोक्का' कारवाईचे ठोकले शतक

Amitabh Gupta : अमिताभ गुप्ता यांनी गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई करण्याचा सपाटाच लावला आहे.

सरकारनामा ब्युरो

पुणे : पुणे शहर पोलिस आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta) यांनी पुण्यातील गुन्हेगारी विश्वाचे कंबरडे मोडण्याचा ध्यास घेतला आहे. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी गुन्हेगारी टोळ्यांच्या बिमोड करण्याचे आदेश दिले होते. (Pune cp Amitabh Gupta latest news)

वर्षभरात त्यांनी ५० मोक्काच्या कारवाया करत पोलिस यंत्रणेला शिस्त लावण्याचा ध्यास धरला होता. पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी नुकतेच मोक्का कारवाईचं शतक ठोकले आहे. 20 सप्टेंबर 2020 ते 7 ऑक्टोबर 2022 दरम्यान त्यांनी विविध गुन्हेगारावर कारवाई केली. एकूण 100 मोक्का कारवाईत गुप्ता यांनी 670 आरोपीवर कारवाई केली.

अमिताभ गुप्ता यांनी गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई करण्याचा सपाटाच लावला आहे. शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले आहे. डोके वर काढू पहाणार्‍या गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का ( महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) कायद्यानुसार कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

आतापर्यंत त्यांनी शहरातील अनेक गुन्हेगारी टोळ्यांची रवानगी येरवडा कारागृहात केली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे पोलीस आयुक्तालयात पदभार स्वीकारल्यानंतर नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन शरीरा विरुद्ध व मालमत्ता विरुद्ध गुन्हे करणाऱ्यावर बारकाईने लक्ष ठेवून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

या मोक्का कारवाईमध्ये पुणे शहरातील कुप्रसिद्ध टोळी मधील गुन्हेगारांचा समावेश आहे. यामध्ये बंडू आदेकर, निलेश घयवाळ, सचिन पोटे, बापू नायर, सुरेश ठोंबरे, महादेव आदलिंगे, अक्रम पठाण यांचा समावेश आहे.

लोन ॲपच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक केलेल्या टोळी विरोधात गुप्ता यांनी नुकतीच मोक्काची कारवाई केली. आरोपी धीरज पुणेकर याच्यासह 8 जणांवर मोक्काअंतर्गत कारवाई केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT