NCP Minister Balasaheb patil
NCP Minister Balasaheb patil 
मुंबई

हमीभावने मूग खरेदी एक ऑक्टोबरपासून : बाळासाहेब पाटील

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : हमीभावाने मूग खरेदीच्या मान्यतेचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे ३१ ऑगस्टला पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला केंद्र शासनाची मान्यता मिळाली असून  राज्यात एक ऑक्टोबरपासून मूग खरेदीला सुरवात होणार आहे. ही खरेदी प्रक्रिया पुढे ९० दिवस सुरू राहणार आहे, अशी माहिती सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे.

राज्यात १५ सप्टेंबरपासून मूग खरेदीसाठीची नोंदणी सुरु झाली आहे. विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचे-२९, मार्केटिंग फेडरेशन-१०५, महाएफपीसी-४७ खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. आतापर्यंत २३० शेतकऱ्यांनी मुगाची नोंदणी केली आहे. शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर नोंदणी करावी, असे आवाहनही मंत्री श्री. पाटील यांनी केले आहे.

नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना नोंदणीच्या क्रमवारीनुसार मूग खरेदी केंद्रावर आणण्यासाठी एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे. ज्या केंद्रावर नोंदणी केली आहे, त्याच केंद्रावर एसएमएस आल्यानंतर शेतकऱ्यांनी शेतमाल घेऊन जावे. हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत मूग हमी भाव सात हजार १९६ असा जाहीर केलेला आहे. सर्व खरेदी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. असेही श्री. पाटील यांनी सांगितले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT