Rahul Gandhi Bharat Jodo Yatra latest news
Rahul Gandhi Bharat Jodo Yatra latest news sarkarnama
मुंबई

Bharat Jodo Yatra : राहुल गांधींमुळे त्यांचे सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचं स्वप्न पूर्ण होणार..

सरकारनामा ब्युरो

Rahul Gandhi : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आज (शुक्रवारी) दुपारी हिंगोली पोहचणार आहे.या यात्रेदरम्यान अनेक जण त्यांना भेटून संवाद साधत आहेत. नांदेड येथे एका मुलानं राहुल गांधी यांची भेट घेतली होती. सर्वेश हातणे असे त्या मुलाचं नाव आहे. (Rahul Gandhi Bharat Jodo Yatra latest news)

राहुल गांधी यांच्याशी संवाद साधताना 'मोठं होऊन सॉफ्टवेअर इंजिनियर बनायचंय,'अशी इच्छा व्यक्त सर्वेश हातणे केली होती. त्यावर राहुल गांधी यांनी त्याला 'कम्प्युटर पाहिला आहे का?'असे विचारले होते. त्यावर त्याने 'नाही' असे उत्तर दिले होते. त्यानंतर झालेल्या सभेत राहुल गांधी यांनी हाच धागा पकडून आर्थिक विषमतेवर ही संधी मिळत नसल्याची टीका केली होती. त्यानंतर आज (शुक्रवारी) सर्वेश हातणे याला राहुल गांधी यांच्या हस्ते लॅपटॅाप भेट देण्यात आला.

भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) आज पाचवा दिवस आहे. राजकीय नेत्यांसह डॉक्टर, इंजिनिअर, वकील, खेळाडू देखील या यात्रेत सहभागी होत आहेत. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळत आहे.

ठाकरे गटाचे नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे हे आज (शुक्रवारी) यात्रेत सहभागी होणार आहेत, त्यांनी याबाबत काल (गुरुवारी) माध्यमांना ही माहिती दिली आहे. भारत जोडो यात्रा आज हिंगोलीत दुपारी पोहचणार आहे. आदित्य ठाकरे हे राहुल गांधी यांच्यासोबत यात्रेत चालणार आहेत.काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे कार्यकर्ते, नेते या यात्रेत सहभागी होणार असून, महाराष्ट्रातील विविध सामाजिक संघटनाही सहभागी होणार आहेत.

भारत जोडो यात्रेत राष्ट्रवादीचे नेते देखील सहभागी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे , राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील , राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काल राहुल गांधीसह पदयात्रेत सहभाग घेतला होता.राज्यभरातून कार्यकर्ते राहुल गांधींना साथ देण्यासाठी या यात्रेत सहभागी होणार आहेत.राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील मार्गावर ज्या दोन मोठ्या सभा होणार आहेत, त्यातील पहिली सभा काल (ता.10) नांदेडमध्ये झाली. तर दुसरी सभा 18 नोव्हेंबरला शेगाव येथे होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT