Rahul Gandhi  Sarkarnama
मुंबई

Rahul Gandhi Nyay Yatra Speech : राहुल-प्रियांका गांधींसह ठाकरेंचे छत्रपतींच्या प्रतिमेस अभिवादन; पहिल्यांदाच शिवाजी पार्कवर...

Chetan Zadpe

Mumbai News : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडा न्याय यात्रेची सांगता आज छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावरती इंडिया आघाडीची जाहीर सभेने होणार आहे. यासाठी इंडिया आघाडीतील सर्व पक्षांचे पक्षप्रमुख आणि महत्त्वाचे नेते यासाठी उपस्थित आहेत. दरम्यान सभा पार पडण्यापूर्वी राहुल गांधी, पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे या तिनही नेत्यांनी लिफ्टमधून उंचावर जाऊन शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. (Latest Marathi News)

यावेळी आता इंडिया आघाडीची सभा पार पडत आहे. यासाठी राहुल गांधींसह ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे, तामिळनाडुचे मुख्यमंत्री स्टॅलिन, नॅशनल काॅन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला, के सी वेणुगोपाल, प्रियांका गांधी, मल्लिकाजूर्न खर्गे, शरद पवार, सोरेन, मेहबुबा मुफ्ती, रेवंथ रेड्डी, वर्षा गायकवाड, सौरभ भारद्वाज, सुखविंदर सखू, अशोक गेहलोत, सुशिलकुमार शिंदे, आदित्य ठाकरे, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, संजय राऊत, जयंत पाटील, विजय वड्डेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, तुषार गांधी आधी नेते उपस्थित होते.

(सविस्तर बातमी लवकरच)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT