Rahul Narwekar  Sarkarnama
मुंबई

Rahul Narwekar : राहुल नार्वेकरांवर आता मोठी जबाबदारी; ओम बिर्लांची घोषणा

Big announcement by Om Birla: पक्षांतरबंदी कायदा समितीच्या अध्यक्षपदी नार्वेकरांची नियुक्ती करण्यात आली.

Ganesh Thombare

Mumbai News: विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर आता मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पक्षांतरबंदी कायदा समितीच्या अध्यक्षपदी नार्वेकरांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ही घोषणा केली. त्यामुळे पक्षांतरबंदी कायद्याचा पुनर्विचार होण्याची शक्यता आहे. (Big responsibility now on Rahul Narvekar )

पक्षांतर बंदी कायद्याबाबत पुनर्विचार करण्यासाठी ओम बिर्ला यांनी रविवारी समिती स्थापन करण्याची घोषणा केली. या समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी राहुल नार्वेकरांवर सोपवण्यात आली. त्यामुळे नार्वेकरांवर आता आणखी एक महत्त्वाची जाबाबदारी असणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गेल्या दीड वर्षात महाराष्ट्रात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. त्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. यानंतर शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी राहुल नार्वेकरांसमोर झाली. त्यानंतर त्यांनी 10 जानेवारीला शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा दिला. यानंतर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणीही नार्वेकरांसमोर सुरु आहे.

शिवसेना (Shiv Sena) आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल देताना नार्वेकरांनी अनेकदा दहाव्या परिशिष्टाचा आणि यातील तरतुदींचा उल्लेख केला होता. आता याच कायद्याची चिकित्सा करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून पक्षांतरबंदी कायद्यात सुधारणा करण्याची शक्यता आहे.

पक्षांतरबंदी कायद्यासंदर्भात घटनेच्या 10 व्या परिशिष्टाच्या संशोधन समितीचे अध्यक्ष म्हणून नार्वेकर यांची निवड होणं, यापेक्षा मोठी शोकांतिका काय असू शकते ? अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी दिली आहे. तसेच स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी तत्त्व आणि नैतिकतेला मूठमाती देऊन जी व्यक्ती सर्व पक्षांसोबत घरोबा करून आलेली आहे, त्याला यापदी नेमणे म्हणजे संविधानिक मूल्यांची थट्टा आहे, त्यामुळे ही संशोधन समिती लोकप्रतिनिधींची काय चिकित्सा करणार ?, असा सवालही आव्हाड यांनी उपस्थित केला.

(Edited By-Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT