शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिले आहेत. आधी शिवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा निकाल देण्यात आला. दोन्ही निकाल सारखेच असल्याची टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि विरोधकांनी केली आहे. यावरून राहुल नार्वेकर आता स्पष्टच बोलले आहेत.
कुठलाही निर्णय दिल्यानंतर एका गटाला न्याय मिळत असतो. त्या निकालाविरोधात तुम्ही कोर्टात दाद मागू शकता. तो तुमचा अधिकार असून, त्याल मी थांबवू शकत नाही. मी घटनेला धरूनच निकाल दिला, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी स्पष्ट केले आहे. Rahul Narwekar News
मी यापूर्वीही सांगितलं आहे की, आपल्या विरुद्ध निर्णय आला की, अशीच शंका उपस्थित करणे, वक्तव्य करणे हे राऊतांचं (Sanjay Raut) नेहमीचं आहे. कोणत्याही संस्थेने त्यांच्या विरोधात निर्णय दिला तर ते वाईट. त्यामुळे मला राऊतांच्या वक्तव्याचं, आरोपांचं काहीही वाटत नाही, असे राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले.
आमदार अपात्रतासंदर्भात (MLA Disqualification verdict) मी जो निकाल दिला तो घटनेला धरून आणि पुराव्यांच्या आधारे दिला. मी दिलेला निर्णय शाश्वत आणि जस्टिफाय आहे, असा दावाही नार्वेकर यांनी केला. यात कोणतीही घटनाबाह्य प्रक्रिया नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
माझा निर्णय चुकीचा किंवा कोणाच्या प्रभावाखाली असेल तर त्यांनी दाखवून द्यावे. मी घेतलेला निर्णय हा सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आहे. तरीही बिनबुडाचे आरोप सुरू आहेत, असा दावा करत दिलेला निर्णय योग्य असून, त्यात काही बदल होणार नाही, असे नार्वेकरांनी स्पष्ट केले.
अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर काँग्रेसचे मुंबादेवीचे आमदार अमीन पटेल (Amin Patel) आणि राहुल नार्वेकर एकत्र आल्यामुळे वेगळ्या चर्चा होऊ लागल्या आहेत. त्यावर राहुल नार्वेकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
जेजे फ्लायओव्हरखालील जागेतील सुशोभीकरणाच्या कामासाठी नार्वेकर आणि काँग्रेसचे अमीन पटेल एकत्र आले होते. नार्वेकरांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पटेल यांनी निश्चित केलेल्या कामात काही बदल सुचवण्यात आले. या अनुषंगाने नवीन आराखडा बनवून त्याला अंतिम रूप देण्यात आले. त्यावरून अमीन पटेल भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
अलीकडे नेते मंडळी आणि कार्यकर्ते भाजपकडे (BJP) आकर्षित होत आहेत, तर त्याचं कारण जाणून घेणे गरजेचे आहे. भाजपच्या चांगल्या कामाने सर्व जण आकर्षित होत आहेत. अमीन पटेल आमचा मतदार संघ बाजूबाजूला आहे. एका कार्यक्रमासाठी आम्ही एकत्र आलो होतो, असे स्पष्टीकरण नार्वेकरांनी दिले आहे.
(Edited by Avinash Chandane)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.