Bala Nandgaonkar, Raj Thackeray Sarkarnama
मुंबई

Video MNS NEWS : मोठी बातमी! मनसेकडून बाळा नांदगावकरांना उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराविरोधात उमेदवारी

Shivsena UBT vs MNS Assembly Election 2024 : शिवडी विधानसभा मतदारसंघ हा दक्षिण मुंबईतील महत्त्वाचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात सध्या शिवसेना ठाकरे गटाचे अजय चौधरी विद्यमान आमदार आहेत.

Jagdish Patil

Raj Thackeray News: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची घोषणा मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी केली आहे. घोषणा केल्यानंतर मनसे निवडणुकीच्या तयारीला लागल्याचं दिसत आहे.

विधानसभेच्या तयारीसाठी मनसेची नवनिर्माण यात्रा सुरु आहे. याच यात्रेच्या निमित्ताने सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. याच दरम्यान आता मनसेने विधानसभा निवडणुकीसाठी दोन उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

याबाबतची माहिती मनसेने (MNS) एक पत्रक प्रसिद्ध करत दिली आहे. मनसेने दक्षिण मुंबईतील शिवडी विधानसभेसाठी राज ठाकरे यांचे शिलेदार बाळा नांदगावकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे. तर पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

मनसेच्या प्रसिद्धी पत्रकात लिहिलं आहे की, मनसे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा 'नवनिर्माण यात्रा' सुरु असून आज सोमवार सोलापूर शासकीय विश्रामगृह येथे मा. राजसाहेब ठाकरे यांनी मनसेच्या दोन विधानसभा उमेदवारांची घोषणा केली आहे.

त्यामध्ये शिवडी विधानसभेसाठी बाळा नांदगांवकर (Bala Nandgaonkar) आणि पंढरपूर विधानसभेसाठी दिलीप धोत्रे या दोन नावांची घोषणा या पत्रकातून केली आहे. शिवडी विधानसभा मतदारसंघ हा दक्षिण मुंबईतील महत्त्वाचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात सध्या शिवसेना ठाकरे गटाचे अजय चौधरी विद्यमान आमदार आहेत.

चौधरी हे 2014 आणि 2019 असे दोनवेळा निवडून आले आहेत. 2014 मध्ये अजय चौधरी यांनी बाळा नांदगावकर यांचा पराभव केला होता. अशातच आता पुन्हा एकदा 2024 च्या विधानसभेसाठी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या विरोधत उमेदवार दिल आहे. त्यामुळे या मतदारसंघातील लढत चुरशीची होणार यात शंका नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT