Gajanan Kale Criticizing MLA Amol Mitkari Sarkarnama
मुंबई

Gajanan Kale: अजितदादांनी स्वतःचा पक्ष काढून 2 आमदार निवडून आणावेत! मिशी कापून हातात देवू...

Mangesh Mahale

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या (Ajit Pawar) नावाचा उल्लेख न करता त्यांच्यावरही मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी निशाणा साधला. दोन पैकी एक उपमुख्यमंत्री पुण्याचे आहेत, ते पुण्यात नसतानाही धरणं वाहू लागली आहेत, एवढं पाणी पडलं. असे राज ठाकरेंनी म्हटलं.राज यांनी अजितदादांवर केलेल्या टीकनंतर आता राष्ट्रवादी आणि मनसेच्या नेत्यांमध्ये जुंपली आहे.

मनसे नेते गजानन काळे यांनी शेलक्या भाषेत अमोल मिटकरी यांचा समाचार घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांना पलटवार केल्यानंतर गजानन काळे यानी मिटकरींवर हल्लाबोल केला आहे.

"टी शर्टवर पेन लावणारा पावसाळी बेडूक मटणकरी कुठला ...आम्हाला शिकवायचं नाय, लायकीत राहायचं, लायकीत," असा इशारा काळे यांनी मिटकरी यांचे नाव न घेता एक्सवर दिला आहे.

राज ठाकरे यांनी अजित पवार यांना लक्ष्य केले होते. अजित पवार पुण्यात नसतानाही येथील धरणं भरली, अशी टिप्पणी राज यांनी सोमवारी केली होती. यानंतर अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले होते. सुपारीबहाद्दरांनी अजित पवारांवर बोलू नये, असा टोला मिटकरी यांनी राज यांना लगावला होता. या टीकेला प्रत्युत्तर गजानन काळे उत्तर दिलं आहे.

अमोल मिटकरी म्हणाले होते...

अजित पवार यांच्यावर राज ठाकरे यांची खोचक टीका केल्यानंतर अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांचा उल्लेख थेट सुपारीबाज असा केला होता. टोल आणि भोंग्याचे आंदोलन फसलेल्या सुपारीबहाद्दरांनी अजित पवारांवर बोलू नये. हे सुपारी बहाद्दर टोल नाक्याचे आंदोलन असेल, भोंग्याचे आंदोलन असेल किंवा आणखी कुठले आंदोलन असेल त्यांना जीवनात कुठल्याही आंदोलनाला यश आले नाही.

राज ठाकरेंना एनडीआरएफचा साधा लाँग फॉर्मही सांगता आला नाही म्हणजे राजकारणातील हा सर्वात मोठा जोक आहे. राज ठाकरे या व्यक्तीची विश्वासार्हता संपली आहे. महाराष्ट्रातील आतापर्यंतच्या राजकीय इतिहासात सर्वात अयशस्वी ठरलेल्या व्यक्तींनी अजितदादांच्या कार्यकर्तुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे म्हणजे हे सूर्याला वाकुल्या दाखवण्यासारखा आहे, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT