मुंबई : मुंबई हायकोर्टाने दसरा मेळाव्यासाठी (Shiv Sena Dasara Melava 2022) शिवसेनेला परवानगी दिली आहे.ठाकरे गटाला परवानगी दिल्याने शिंदे गटाची गोची झाली आहे. या निर्णयाविरोधात शिंदे गट सुप्रीम कोर्टात जाणार आहे. मनसे नेते प्रकाश महाजन यांनी दसरा मेळाव्यावरुन मोठं विधान केल आहे. या विधानाची सध्या चर्चा सुरु आहे.
"मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दसरा मेळाव्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक सल्ला दिला होता," असे प्रकाश महाजन यांनी सांगितले. महाजन माध्यमांशी बोलत होते.
प्रकाश महाजन म्हणाले, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंचा तो सल्ला मानला असता तर त्यांची ही गोची टळली असती. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचा हट्ट करू नका,असा सल्ला राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना आधीच दिला होता," " दसरा मेळावा आणि शिवसेना हे एक समीकरण आहे. बाळासाहेब ठाकरे आणि शिवाजी पार्क यांच आगळंवेगळं नात असल्याने इतरांनी त्यात पडू नये," असेही राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना म्हणाले होते.
महाजन म्हणाले, "दसरा मेळाव्याचा विषय निघाला त्यावेळी आमच्या पक्षातील काही कार्यकर्त्यांचे म्हणणे होते की, राज ठाकरेंनी सुद्धा दसरा मेळावा घ्यावा. ठाकरेंना हे सांगण्याची जवाबदारी त्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर टाकली होती. मी ठाकरेंना याबाबत विचारले. तेव्हा ते म्हणाले की, वर्षोनुवर्षे दसरा मेळावा म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि शिवाजी पार्क हे समीकरण घट्ट आहे. त्यामुळे या समीकरणात आपण जाणे म्हणजे कुंतेल पणाच लक्षण ठरेल. त्यामुळे हे समीकरण असेच राहिले पाहिजे, असे राज ठाकरे मला म्हणाले होते,"
शिवाजी पार्क मैदानावर शिवसेना दसरा मेळावा घेण्यासंदर्भातील याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी (23 सप्टेंबर) निकाल दिला. या निकालानुसार 2 ऑक्टोबर ते 6 ऑक्टोबर या कालावधीत शिवाजी पार्क मैदान दसरा मेळाव्यासाठी वापरण्याची परवानगी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मुंबई हायकोर्टाने दिली आहे. या निकालामुळे शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचा आव्वाज पुन्हा एकदा शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यात घुमणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.