Uddhav Thackeray, Raj Thackeray Sarkarnama
मुंबई

Thackeray Politics : मोठी बातमी! राज ठाकरेंकडून उद्धव ठाकरेंना युतीचा प्रस्ताव; म्हणाले, 'आमच्यातील भांडणं छोटी पण ...'

Raj Thackeray Offers Alliance to Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला फोटो फटका बसला होता.

Roshan More

Raj Thackeray Vs Uddhav Thackeray : मुंबई महापालिकेच्या दृष्टिने सर्वच राजकीय पक्षांची मोर्चे बांधणी सुरू आहे. नुकतेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज ठाकरेंच्या निवास्थानी स्नेहभोजनासाठी गेले होते. त्यामुळे एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे यामध्ये युती होणार असल्याची चर्चा होती. मात्र, राज ठाकरेंनी नुकत्याच महेश मांजरेकरांना दिलेल्या मुलाखतीमध्ये युतीसाठी उद्धव ठाकरेंना युतीचा प्रस्ताव दिला.

राज ठाकरे म्हणाले, मी युतीसाठी उद्धव ठाकरेंना प्रस्ताव पाठवला आहे. महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी एकत्र येण्यामध्ये काहीच चूक नाही. आमच्यातील भांडणं छोटी आहेत पण महाराष्ट्र खूप मोठा आहे.

विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला फोटो फटका बसला. मनसेचा एकही उमेदवार विजयी होऊ शकला नाही. त्यामुळे आगामी महापालिका निवडणूक ही दोन्ही ठाकरे बंधुच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येणार का? अशी चर्चा सुरू झाली होती.

राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसोबत युतीसाठी तयार असल्याच्या जरी जाहीर केल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, राज ठाकरे भाजपचा विरोध करणार असतील तर त्यांचे स्वागत आहे. तर, अंबादास दानवे यांनी म्हटले की, असा प्रसारमाध्यमांमध्ये प्रस्ताव देऊन काही होत नसते. खरच मनात इच्छा असेल तर इतर मार्ग असतात. महाराष्ट्राच्या हितासाठी पाऊल उचलत असतील तर स्वागत केले पाहिजे पण भाजपच्या हिसासाठी पाऊल उचलत असतील तर विरोध केला पाहिजे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT