Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी घडामोड समोर आली आहे. दिवंगत अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आज सकाळी अचानक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाले आहेत. अजित पवारांच्या निधनानंतर पहिल्यांदाच पार्थ पवार आणि राज ठाकरेंची भेट होत असल्याने चर्चांना उधाण आले आहे.
पार्थ पवार हे सुमारे दीड तासांपासून ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी आहेत. काही दिवसांपूर्वीच आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत राज ठाकरेंनी भेट घेतली होती. त्यानंतर आता पार्थ पवारही राज ठाकरेंना भेटत आहे. या भेटीमागचे कारण मात्र अद्याप समोर आलेले नाही. त्यामुळे ही भेट नेमकी कशासाठी याबाबत उत्सुकता वाढली आहे.
अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर सध्या राजकीय गणितं वेगाने बदलत आहेत. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपदही स्वीकारले आहे. त्या आता राजकारणात पुर्णपणे सक्रीय झाले आहेत. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी पाहायला मिळत आहे. काही नेत्यांकडून उघडपणे काही ज्येष्ठ नेत्यांना लक्ष्य केले जात असल्याचे पाहायला मिळत आहे.
पार्थ पवार यांचीही राज्यसभेवर वर्णी लागली आहे. नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत ते बिनविरोध निवडून गेले आहे आहेत. अद्याप त्यांनी सदस्यत्वाची शपथ घेतलेली नाही. आज त्यांनी अचानक राज ठाकरेंनी भेट घेतल्याने आता तेही राजकारणात पुर्णपणे सक्रीय झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
पवार आणि ठाकरे कुटुंबीयांचे संबंध गेल्या अनेक वर्षांपासूनचे आहेत. त्यामुळे पार्थ पवार हे राज ठाकरेंशी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याबाबत उत्सुकता वाढली आहे. अद्याप याबाबत पार्थ पवार किंवा राज ठाकरे यांच्याकडून या भेटीबाबत कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.