मुंबई

बाळासाहेबांचा 'तो' व्हिडीओ ट्विट करत राज ठाकरेंचा शिवसेनेवर निशाणा

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या आदेशानंतर आजपासून मनसैनिकांकडून भोंग्यांच्या विरोधात आंदोलन सुरू झालं आहे. पहाटेच्या वेळी अजान सुरु होताच मनसे कार्यकर्त्यांकडून मशिदींसमोर हनुमान चालिसा पठण करण्यात आलं. राज ठाकरेंच्या आदेशानांतर आता मनसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. राज ठाकरेंवर कारवाईची टांगती तलवार असतानाच त्यांनी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना व्हिडिओ ट्वीट केला आहे.

राज ठाकरे यांनी हा व्हिडीओ ट्वीट करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. या व्हिडिओच्या व्हिडिओमध्ये बाळासाहेबांनी मशिदीवरील भोंग्याबाबत आक्रमक भूमिका मांडली आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकाद्वारे मशिदीवरील भोंग्यांविरोधात भूमिका कायम ठेवल्याचे सांगितले. त्यानंतर राज्यात ठिकठिकाणी मनसे कार्यकर्त्यांकडून हनुमान चालिसा पठण केलं जात आहे. तसेच, या पत्रात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणार की शरद पवार यांचं ऐकणार, असा सवालही केला होता.

मनसेच्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी राज्यभरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे शहरात विविध ठिकाणी स्वत: गस्त घालून आढावा घेत आहेत. त्याचबरोबर, काही ठिकाणी पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतलं आहे.

काल रात्री पोलिसांनी मनसेच्या जवळपास 20 ते 25 कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं. ठाणे आणि इंदिरा नगरमध्ये काही परिसरात आज पहाटे अजान सुरु होताच लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा लावण्यात आली. तर कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेच्या 50 हून अधिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीसा पाठवल्या होत्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT