sandeep deshpande, Avinash Jadhav
sandeep deshpande, Avinash Jadhav sarkarnama
मुंबई

MNS:राज ठाकरे 'उत्तरसभे'त काय बोलणार ; संदीप देशपांडेंनी दिलं उत्तर..

सरकारनामा ब्युरो

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS)अध्यक्ष राज ठाकरे यांची येत्या शनिवारी (ता.९) ठाण्यात सभा होत आहे. आठवडाभरात राज यांची ही दुसरी सभा आहे. गुढी पाडव्याला शिवाजी पार्कवर झालेल्या सभेनंतर लगेच दुसरी सभा राज ठाकरे (Raj Thackeray) का घेत आहे, असा प्रश्न विचारण्यात येत आहे. ते कोणत्या मुद्यांवर बोलणार याबाबत तर्कविर्तकांना उधाण आलं आले.

ही सभा येत्या 9 एप्रिल रोजी ठाणे येथील गडकरी रंगायतनजवळ सायंकाळी 6.30 वाजता होणार आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे (sandeep deshpande) आणि ठाणे मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी याबाबत मनसे अधिकृत या ट्विटर हँडलवर याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी व्हिडिओ टि्वटवरुन शेअर केला आहे.

''मशिदीवरील भोंगे राज्य सरकारनं हटवावे, नाहीतर मनसे कार्यकर्ते ते हटवतील. त्याविरोधात हनुमान चालीसा पटण देखील केले जाईल, असे राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कच्या सभेत म्हटलं आहे. त्याचे पडसाद अद्यापही राज्यात उमटत आहेत.

मनसे पदाधिकाऱ्यामध्येही याबाबत मतभेद आहेत. पु्ण्यात राज ठाकरे यांचा हा आदेश त्यांच्याच कट्टर समर्थकाने धुडकावून लावला आहे. मनसेचे पुण्याचे शहराध्यक्ष आणि माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्या या आदेशाचे पुण्यात पालन होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. ''सध्या रमजान सुरू आहे. त्यामुळे माझ्या प्रभागात मला शांतता हवी आहे. म्हणून असे कोणतेही पाऊल उचलणार नाही. काही अनधिकृत गोष्टी असल्यास राज्य सरकारने त्यावर कारवाई करावी, असेही वसंत मोरे म्हणाले.

या व्हिडिओमध्ये संदीप देशपांडे म्हणतात, ''शिवतीर्थावर झालेल्या राज ठाकरे यांच्या भाषणानंतर अनेकांना मिरच्या झोंबल्या. पण काहींनी त्यावरुन अनेक समज-गैरसमज करुन घेतले. त्यामुळे ठाणे येथे होणारी सभा ही एका अर्थाने 'उत्तरसभा' असणार नाही. आपल्या परंपरेत कोणतीही एखादी मोठी पूजा घातली की त्यानंतर उत्तरपूजा केली जाते. तशीच आता शिवाजी पार्क मैदानावरील राज ठाकरे यांच्या सभेनंतर ठाणे येथे 'उत्तरसभा' घेतली जाईल,''

मशिदीवरील अनाधिकृत भोंगे काढण्याबाबत पुण्यात मनसे 'खळखट्याक' करणार आहेत. पण या दरम्यान दुसरीकडे मुस्लिम समाजाने राज ठाकरे यांचा निषेध केला आहे. पुण्यातील कोंढवा येथील नुरानी कब्रस्थानचे भूमिपूजन राज ठाकरे यांच्या हस्ते झाले होते. त्या बाबतचा फलक येथे लावण्यात आला आहे. आज या फलकावरील राज ठाकरे यांच्या नावाला स्थानिक लोकांनी काळा रंग लावून राज ठाकरे यांचा निषेध केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT