Raj Thackeray |NCP
Raj Thackeray |NCP Sarkarnama
मुंबई

राज ठाकरे अयोध्या दौरा: शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीनेही मनसेला डिवचलं

सरकारनामा ब्युरो

NCP critic on Raj Thackeray

मुंबई : 'रामचंद्र कह गये सीता मैंयासे ऐसा कलयुग आयेगा... ठाकरे सरनेम होनेपर भी वो ब्रिजभूषण से डर जायेगा...' असा जबरदस्त टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक कार्याध्यक्ष आणि प्रदेश प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे.

राज ठाकरे यांच्या अयोध्या (Ayodhya) दौऱ्यावरुन राजकारण चांगलंच तापायला लागले होते. राज ठाकरे येत्या पाच जूनला अयोद्धेला जाणार होते. (Raj Thackeray latest news) काही कारणामुळे राज ठाकरे यांचा हा दौरा स्थगित करण्यात आला आहे.

अयोध्या दौर्‍यावरुन उत्तरप्रदेशमध्ये भाजप खासदार ब्रिजभूषण यांनी राज ठाकरे यांना खुले आव्हान दिले आहे. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांवर केलेल्या अन्यायाची माफी मागावी, तरच आम्ही त्यांनी अयोध्येत पाय ठेवून देऊ, असा थेट इशाराचा ब्रिजभूषण सिंह यांनी मनसेला दिला आहे. मात्र त्यावर राज ठाकरे यांनी एकदाही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान महाराष्ट्रात राज गर्जना करणारे राज ठाकरे चक्क उत्तरप्रदेशच्या खासदाराच्या धमकीला घाबरले असल्याची चर्चा असून त्यावर सुरज चव्हाण यांनी ट्वीट करत जोरदार टीका केली आहे.

राज्यातही यावरुन वातावरण चांगलंच तापलं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीने यावरुन मनसेवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. ''आम्ही अयोध्या, वाराणसी, काशी इथे नेहमीच जात असतो. कोणाला या ठिकाणी दौऱ्यावर वगैरे जायचं असेल आणि त्याला काही अडचणी असतील तर आम्ही मदत करतो. इतर कुणी जात नसले तरी आदित्य ठाकरे १५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत आणि त्यांच्यासोबत ज्यांना यायची इच्छा असेल तर त्यांनी नक्की यावं", अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. तसेच, पण राज ठाकरेंच्या दौऱ्याबाबत भाजपने असं का केलं? भाजप आपल्या राजकीय स्वार्थासाठी कायम लहान पक्षांचा असाच वापर करत आला आहे, हे आता तरी मनसेने लक्षात घ्यावं", असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT