Jayant Patil Raju Shetti .jpg Sarkarnama
मुंबई

Jayant Patil On Raju Shetti: ...तर राजू शेट्टी आज खासदार राहिले असते!'; जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट

Shaktipeeth Mahamarg Protest :स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी लोकसभेची निवडणूक स्वबळावर लढले होते. त्यांनी महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हींशीही जुळवून घेतले नव्हते.याचवरुन पाटील यांना राजू शेट्टी यांनी टोला लगावला

Deepak Kulkarni

Mumbai News : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.तसेच त्यांनी स्वत:याबाबत खुलासा करुनही त्या चर्चा थांबायला तयार नाहीत. यातच आता जयंत पाटील (Jayant Patil) जाहीर भाषणातूनच ‘माझे काही खरे नाही, माझ्यावर विश्वास ठेवू नका,असं धक्कादायक विधान केल्यानं राजकीय वर्तुळात मोठ्या भूकंपाचे संकेत तर दिले नाही ना अशी चर्चा सुरू झाली आहे. यातच त्यांनी शेतकरी नेते राजू शेट्टींविषयीही मोठा गौप्यस्फोट केला आहे.

महायुती सरकारचा विशेषत: मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 'ड्रीम प्रोजेक्ट' असलेल्या शक्तिपीठ महामार्गाविरोधात बुधवारी (ता.12) मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्यात आलं.यावेळी शक्तिपीठ महामार्गाशी संबंधित 12 जिल्ह्यातील हजारो शेतकरी कुटुंबासह या आंदोलनासाठी दाखल झाले होते. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी मोठं विधान करुन खळबळ उडवून दिली.

जयंत पाटील म्हणाले, माझे काही खरे नाही,माझ्यावर विश्वास ठेवू नका.यानंतर त्यांनी हे वक्तव्य नेमकं का केलं? याविषयी चर्चांना उधाण आलं आहे. त्या वक्तव्याचा अर्थ काय,त्यांचा हा शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षासाठी हा इशारा तर नाही ना याविषयी उलटसुलट चर्चा जोर धरू लागल्या आहेत.

याचवेळी जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात थेट स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्याविषयीही मोठा गौप्यस्फोट केला आहे.ते म्हणाले, आपलं ऐकलं असतं, तर ते आज खासदार राहिले असते,असं वक्तव्य केलं आहे.यावेळी त्यांनी शेट्टी माझा सल्ला ऐकत नाही,अशी खंतही बोलून दाखवली होती.तसेच त्यांनी शक्तिपीठ महामार्गाविरोधात आंदोलनात सहभागी झालेल्या नेत्यांना एकी कायम ठेवण्याचं आवाहन करत संघर्ष करण्यासाठी ठाम रहा असा सल्लाही दिला.

शक्तिपीठ महामार्गाविरोधातील आंदोलनासाठी मुंबईत कोल्हापूर आणि सांगलीसह बारा जिल्ह्यांतील शेतकरी आंदोलनासाठी एकत्र आले होते. यावेळी आंदोलनकर्त्यांना भेट देण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते सहभागी झाले होते. या आंदोलनादरम्यान खूप मोठ्या कालावधीनंतर पश्चिम महाराष्ट्रातले जयंत पाटील आणि राजू शेट्टी हे दोन तगडे नेतेही एकत्र आले होते.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी लोकसभेची निवडणूक स्वबळावर लढले होते. त्यांनी महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हींशीही जुळवून घेतले नव्हते.याचवरुन पाटील यांना राजू शेट्टी यांनी टोला लगावला. ते म्हणाले, राजू शेट्टी आमचा सल्ला ऐकत नाही. त्यांनी माझे ऐकले असते तर ते खासदार राहिले असते असं म्हटलं आहे.

जयंत पाटील यांनी मागणी नसताना नवीन मार्ग तयार केले जात आहे. विकासाला आमचा विरोध नाही.पण सरकार नवे,नवे रस्ते करण्यात का इंटरेस्ट घेतंय, हे कळत नाही. मोठ मोठे प्रकल्प घ्यायचे, त्यातून निधी उपलब्ध करायचा, असा प्रकार सुरु आहे. पण ज्याची जमीन जात असेल त्यांचा उपजीविकेचा प्रश्न निर्माण होत असल्याचं म्हटलं आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT