Ashish Shelar, Raj Thackeray Sarkarnama
मुंबई

शेलारांनी राज ठाकरेंना दिले धन्यवाद ; म्हणाले, 'आमच्या विनंतीला मान..'

राज ठाकरे यांना भेटलो पक्षाच्या वतीने राज्यसभेसाठी मनसेचं असलेलं एक मत भाजपला मिळावे, यासाठी विनंती केली.

सरकारनामा ब्युरो

पुणे : राज्यसभा निवडणुकीत (Rajya sabha Election 2022) मनसेचे मत कुणाला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानंतर निर्णय घेऊ, असे सांगितले. या पार्श्वभूमीवर आज भाजपचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. राज यांच्या भेटीनंतर मनसेचे मत भाजपला पडेल, असा विश्वास आशिष शेलार यांनी यावेळी व्यक्त केला. (Ashish Shelar latest news)

आशिष शेलार म्हणाले, "मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटलो पक्षाच्या वतीने राज्यसभेसाठी मनसेचं असलेलं एक मत भाजपला मिळावे, यासाठी विनंती केली,आम्ही धन्यवाद व्यक्त करतो आमच्या विनंतीला मान दिला, ते मत भाजपला पडेल असा विश्वास दिला. मनसेचे आमदार राजू पाटील उपस्थितीत होते," पण मनसेकडून अद्याप याबाबतचे स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

"महाविकास आघाडी बैठकीत त्यांनी १३ आमदार आपलेच आहेत,असे म्हटलं आहे. या भम्रात त्यांनी राहावं, मेरे अंगने मे तुम्हारा क्या काम आहे, असं म्हणावं लागेल. जे मूख्यमंत्री 'जिंकू' असे म्हणतात अन् स्वतःच्या आमदारांना का पळवावं लागत आहे,नजर कैदेत का ठेवावं लागतं आहे, मग १०० टक्के विश्वास असताना का आमदार पळवत आहेत," असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला.

"काल ज्या बातम्या आल्या की आमदार नाराज असतील तर स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अन् बाळासाहेब थोरात यांनी ऐकलं पाहिजे," असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार देतात, तर यात सगळं आलं,निवडणुकीत सगळं समोर आलं आहे," असे शेलार म्हणाले.

"राज्यसभा अन् विधानपरिषदेची पाचवी जागा पण जिंकू तिकडे गुप्त मतदान आहे. जास्त मताने आम्ही जिंकू," असे शेलार म्हणाले. "पंकजाताई, आमच्या राष्ट्रीय नेत्या आहेत, त्याच्याकडे असलेलं पदही मोठं आहे, त्यांना मिळणारी संधी तुम्ही चालवणाऱ्या बातम्या पेक्षाही मोठी असेल," असे शेलार म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT