BJP Devendra Fadnavis Latest Marathi News
BJP Devendra Fadnavis Latest Marathi News  Sarkarnama
मुंबई

त्यांचं 'थम्प्स अप' कधीही विसरणार नाही! फडणवीस झाले भावनिक

सरकारनामा ब्युरो

मुंबई : जीवघेण्या आजाराशी झुंज देणारे भाजपचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) आणि पुण्यातील कसबा मतदारसंघातील आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांनीही राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान केलं. मतदानासाठी दोघेही रुग्णवाहिकेतून विधान भवनात दाखल झाले होते. दोघांची ही पक्षनिष्ठा पाहून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) भावनिक झाले. (Rajya Sabha Election 2022)

फडणवीस यांनी जगताप आणि टिळक या विधान भवनात आले त्यावेळचा व्हिडीओ आणि फोटो ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 'दोघांचाही पक्षाशी असलेली कटिबध्दता पाहून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मला शब्द सुचत नाहीत. गंभीर आजार असतानाही त्यांनी राज्यसभेच्या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावला,' असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दोघांना विधान भवनात पाहिल्यानंतर त्यांचा उत्साह भाजपच्या इतर कार्यक्रमांप्रमाणेच कायम होता. त्यांचे ते थम्प्स अप आम्ही कधीही विसरणार नाही, अशा शब्दांत फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

दरम्यान, लक्ष्मण जगताप हे गेल्या काही दिवसांपासून दुर्धर आजाराशी लढा देत आहेत. अमेरिकेहून मागवलेल्या इंजेक्शननंतर त्यांची प्रकृती सुधारत गेली, त्यानंतर सुमारे ५० दिवसानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते. त्याचदरम्यान राज्यात राज्यसभेची निवडणूक लागली होती. जगताप हे भाजपच्या चिन्हावर निवडून आले आहेत. त्या भाजपने राज्यसभेसाठी एक अधिकचा उमेदवार रिंगणात उतरवला आहे, त्यामुळे मोठी चुरस दिसून येत आहे.

आमदार जगताप हे आज सकाळी कार्डियाक रुग्णवाहिकेतून राज्यसभा निवडणुकीसाठी मुंबईला रवाना झाले. ते दुपारी साडेबाराच्या सुमारास विधान भवनाच्या परिसरात दाखल झाले, त्यावेळी खुद्द माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लक्ष्मण जगताप यांना आणण्यासाठी आले होते. रुग्णवाहिकेतून खाली उतरल्यानंतर लक्ष्मण जगताप यांनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख सीएम साहेब, सीएम साहेब असा केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT