Rajya Sabha Election
Rajya Sabha Election  sarkarnama
मुंबई

राज्यसभा निवडणुकीत मोठा ट्विस्ट : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतमोजणीस परवानगी नाही

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election) मोठा ट्विस्ट आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभा निवडणुकीत झालेल्या मतांची मोजणी करण्यास परवानगी दिली नसल्याचे पुढे आले आहे. या निवडणुकीदरम्यान महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि भाजपच्या (BJP) वतीने काही आक्षेप घेण्यात आले हेाते. मात्र, दोन्ही बाजूचे आक्षेप राज्य निवडणूक आयोगाने फेटाळले हेाते. (Rajya Sabha Election : Counting of votes is not permitted by Central Election Commission)

राज्यसभा निवडणुकीसाठी आज मोठ्या चुरशीने मतदान झाले. राज्यातील २८८ पैकी २८५ आमदारांनी मतदान केले आहे. या मतदानादरम्यान महाविकास आघाडीतील मंत्री जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर, सुहास कांदे यांनी मतदान केल्यानंतर आपल्या मतपत्रिका पक्षप्रतोदाशिवाय इतर नेत्यांना दाखवल्याचा आक्षेप भाजप आणि पराग आळवणी यांच्याकडून घेण्यात आला होता. आव्हाड यांनी जयंत पाटील यांच्याकडे, ठाकूर यांनी नाना पटोले यांना, तर कांदे यांनी अरविंद सावंत यांना मतपत्रिका दाखवली होती. ही मते बाद करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. यासंदर्भातील व्हिडिओ चित्रीकरणाचे सादरीकरण भाजप केंद्रीय निवडणूक आयोगापुढे करणार आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीकडूनही सुधीर मुनगंटीवार यांच्याबाबत आक्षेप घेण्यात आला होता. त्यांनी मतदान केल्यानंतर आपली मतपत्रिका चंद्रशेखर बावनकुळे यांना दाखविल्याचा आक्षेप काँग्रेसचे आमदार अमर राजूकर यांनी घेतला होता. मात्र, भाजप आणि काँग्रेसकडून घेण्यात आलेले आक्षेप राज्य निवडणूक आयोगाने फेटाळून लावले होते.

मुख्तार अब्बास नक्वी यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र आणि हरियाणा येथील राज्यसभा निवडणुकीबाबत तातडीने केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेतली आहे. त्यानंतर माध्यमांशी बोलताना नक्वी सांगितले की, हरयाणा आणि महाराष्ट्रातील निवडणूक प्रक्रियेवर आमचा आक्षेप आहे. मात्र, राज्यातील भाजपच्या नेत्यांनी आक्षेप घेतले हेाते. मात्र, राज्याच्या निवडणूक आयोगाने त्याबाबची पुरेशी सुनावणी न घेता भाजपचे आक्षेप फेटाळून लावले आहेत. त्यामुळे ही निवडणूक प्रक्रिया तातडीने थांबवावी, अशी मागणी आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्याबाबतची संपूर्ण चौकशी पूर्ण होईपर्यंत मतमोजणी थांबवण्याची मागणी केली आहे.

भाजप नेत्यांच्या मागणीनुसार राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी थांबविण्यात आलेली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आव्हाड, ठाकूर आणि कांदे यांचे मतदानाचे व्हिडिओ मागून घेतले आहेत, ते तपासूनच पुढचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT