Eknath Shinde  Sarkarnama
मुंबई

Rajya Sabha Election : राज्यसभेसाठी एकनाथ शिंदेंचा उमेदवार ठरला? ; 'या' महिला नेत्याला मिळणार संधी...

Rajya Sabha Elections Jyoti Waghmare : राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघा एक दिवस शिल्लक आहे. मात्र, महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवारांची नावे निश्चित झाली नाहीत. एकनाथ शिंदे ऐनवेळी धक्कातंत्र देत नवीन उमेदवार देण्याची शक्यता आहे.

Roshan More

Rajya Sabha Elections : राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे. एकनाथ शिंदेंच्या वाट्याला राज्यसभेची एक जागा येत आहे. या जागेसाठी शिंदेंच्या पक्षातून अनेक दिग्गज इच्छुक आहेत. मात्र, या उमेदवाराठी माजी खासदार राहुल शेवाळे यांचे नाव निश्चित झाल्याची चर्चा आहे. मात्र, ऐनवेळी शिंदे धक्कातंत्र देत महिला उमेदवाराला संधी देण्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

उमेदवारी दाखल करण्यासाठी अवघ्या काही तासांचा वेळ शिल्लक राहिला असताना धक्कातंत्र ज्योती वाघमारे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून दलित समाजातील आक्रमक चेहरा असणाऱ्या ज्योती वाघमारे यांना संधी मिळणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.

आपल्या उमेदवारी मिळावी म्हणून शिवसेनेतील महिला नेत्या शायना एन सी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट काही दिवसांपूर्वी घेतली होती. शिंदेंच्या शिवसेनेला दिल्लीमध्ये पक्षाची बाजू मांडले, असा चेहरा हवा आहे. त्यामुळे शायना एन सी यांना संधी मिळेल, अशी चर्चा आहे. मात्र, एकनाथ शिंदेंनी अजुनही आपल्या उमेदवाराचे नाव निश्चित केले नाही. ज्योती वाघमारे

शायना एन सी या भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या होत्या. त्यांनी विधानसभा निवडणुकीच्याआधी भाजपमधून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांनी विधासभा निवडणूक लढली मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

शेवाळेंची उमेदवारी निश्चित

पक्षसंघटनेत काम करणाऱ्या नेत्याला संधी देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे राहुल शेवाळे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. दरम्यान, दिल्लीमध्ये राष्ट्रीय माध्यमांमध्ये शिवसेनेची बाजू मांडणार चेहरा हवा असल्याची देखील चर्चा असल्याने शायना एन सी यांना संधी द्यावी असा देखील एक मतप्रवाह आहे. तर दलित, आक्रमक चेहरा म्हणून ज्योती वाघमारे यांच्या नावाची चर्चा सुरू होती. तसेच संजय निरुपम यांना देखील मुंबईतील उत्तर भारतीय मतांचा विचार करून संधी द्यावी, असे बोलले जात आहे. दरम्यान, शेवाळे यांचे नाव निश्चित झाल्याचे समजते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT