काँग्रेसला रामराम करून भाजपमध्ये दोन दिवसांपूर्वी दाखल झालेले अशोक चव्हाण यांना आज राज्यसभा उमेदवारी देण्यात आली आहे. अशोक चव्हाण यांना राज्यसभा उमेदवारीची लॉटरी लागलेली नाही. तर हे सर्व आधीच फिक्स होते. हे सर्व देवेंद्र फडणवीस यांनी घडवून आणल्याचीही चर्चा आहे.
अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेसचा राजीनामा दिला. पुढील दोन दिवसांत आपण आपली राजकीय भूमिका स्पष्ट करू, असे राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाण यांनी म्हणाले होते. पण दुसऱ्याच दिवशी म्हणजे मंगळवारी ( 13 फेब्रुवारी ) अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश हा केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांच्या उपस्थित होणार होता. पण अमित शहांचा महाराष्ट्र दौरा अचानक रद्द झाल्याने Ashok Chavan यांचा भाजप प्रवेश मंगळवारीच करण्यात आला.
अशोक चव्हाणांचा भाजप प्रवेश इतक्या घाईत का करण्यात आला याचे कारण आता स्पष्ट आहे. हे कारण आहे राज्यसभेची उमेदवारी. अशोक चव्हाण यांनी काल भाजपमध्ये प्रवेश करताच आज चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाली. म्हणजेच अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी मिळणार हे आधीच ठरले होते. त्यामुळेच अशोक चव्हाणांचा भाजप प्रवेश लवकर करण्यात आल्याची चर्चा आहे.
फडणवीसांनी दिले होते संकेत
अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशावेळी पत्रकार परिषदेत एक प्रश्न विचारण्यात आला होता. अशोक चव्हाण यांची पक्षात भूमिका काय असेल? असा हा प्रश्न होता. या प्रश्नाला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. अशोक चव्हाण हे दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. इतके मोठे नेते भाजपमध्ये आल्याने पक्षासाठी ही मोठी बाब आहे. त्यांची पत ही राष्ट्रीय स्तरावरील आहे. त्यामुळे भाजपचे केंद्रीय नेतृत्वच त्यांच्याबाबत निर्णय घेईल, असे सूचक वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरा देताना केले होते. त्याचवेळी अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित झाले होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दोन वर्षापूर्वीच आधीच भाजपमध्ये प्रवेश करणार होते, असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. दोन वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर विधानसभेत विश्वासदर्शक प्रस्ताव मांडला होता. शिंदे फडणवीस सरकारच्या या विश्वासदर्शक प्रस्तावावर मतदान करतेवेळी अशोक चव्हाण यांच्यासह 11 आमदार अनुपस्थित राहिले होते. त्यावरून अशोक चव्हाणांवर टीका झाली होती. तसेच जून 2022 मध्येही राज्यसभा आणि विधानपरिषद आमदारांच्या निवडणुकीवेळी काँग्रेसमधून काही आमदारांनी भाजपला क्रॉस व्होटिंग झाले होते. त्यावेळी अशोक चव्हाणांवर बोट दाखवण्यात आले होते. यामुळे तेव्हाच अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जातील, अशी राजकीय चर्चा रंगली होती.
राज्यसभेची उमेदवारी जाहीर होताच अशोक चव्हाण यांनी ट्विट करून पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांचे आभार मानले आहेत. भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचेही त्यांनी आभार मानले. आपल्यावर मोठी जबाबदारी सोपवली असून ती प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन, असे अशोक चव्हाण म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.