Kangana Ranaut and Rakhi Sawant Sarkarnama
मुंबई

कंगनावर राखी सावंत भडकली अन् म्हणाली...

वादग्रस्त वक्तव्यावरुन अभिनेत्री कंगना राणावत वादात सापडली आहे. आता या वादात अभिनेत्री राखी सावंतने उडी घेतली आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : भारताला (India) 1947 मध्ये मिळालेले स्वातंत्र्य (Independence) हे भीक म्हणून मिळाले होते, खरे स्वातंत्र्य तर 2014 मध्येच मिळाले, या वक्तव्यावरुन अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) चांगलीच वादात सापडली आहे. यावरून तिच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. आता या वादात अभिनेत्री राखी सावंतने (Rakhi Sawant) उडी घेतली आहे. तिने कंगनावर हल्लाबोल केला आहे.

राखी सावंतने कंगनाचा उल्लेख गद्दार असा केला आहे. राखीने कंगनाचा वादग्रस्त व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. देश की गद्दार है दीदी, असे तिने पोस्टखाली म्हटले आहे. यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. अनेकांनी राखी सावंतचे कौतुक केले आहे. अनेक नेटिझन्स राखीबद्दल आदर व्यक्त केला आहे. काही नेटिझन्सनी तर तिला नॅशनल क्रश घोषित केले आहे. एका यूजरने राखीला प्रश्नही विचारला आहे. तिच्याकडे पद्मश्री आहे तर तुझ्याकडे काय आहे, अशी विचारणा त्याने केली आहे. यावर राखीने तो कंगनाला भिकेत मिळाला आहे, असा टोमणा मारला आहे.

कंगनाचे टीकाकारांना प्रतिआव्हान

कंगनाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून हे आव्हान दिले आहे. यात तिने 1947 मध्ये कोणते युद्ध झाले, असा सवालही केला आहे. तिने एका पुस्कातील काही उतारेही दिले आहेत. तिने म्हटले आहे की, सगळीकडे स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला आहे की, 1857 चा लढा हा स्वातंत्र्यलढा होता. याचबरोबर सुभाषचंद्र बोस, राणी लक्ष्मीबाई आणि वीर सावरकरजी यांच्या बलिदानामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. मला 1875 माहिती आहे पण 1947 मध्ये कोणते युद्ध झाले. कुणी मला याबद्दल ज्ञान दिल्यास मी माझा पद्मश्री परत करेन. याचबरोबर सर्वांचा माफीही मागेन.

कंगनाविरोधात देशद्रोहाची तक्रार

कंगनाविरोधात आधी मुंबई पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता. आता पुन्हा एकदा कंगना मुंबईसह इतर ठिकाणी तिच्या विरोधात तक्रारी पोलिसांकडे आल्या आहेत. तिच्या विरोधात आता आम आदमी पक्षाच्या (AAP) राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या प्रिती शर्मा मेनन यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे. कंगनाने देशद्रोही आणि भावना भडकावणारे वक्तव्य केले आहे. यामुळे तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT