Rakhi Sawant ON Triple Talaq Law : बॉलीवुडची 'ड्रामाक्वीन' राखी सावंत (Rakhi Sawant)सध्या तिच्या व्यक्तीगत आयुष्यामुळे चर्चेत आहे.
राखी सावंत हीने तिचा पती आदिल खान दुर्रानीवर (Adil Khan Durrani) गंभीर आरोप केले आहेत. राखी सावंतने पोलिसा दिलेल्या तक्रारीनंतर आदिल खान गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या तो कारागृहात आहे.
राखीने तिच्या पतीवर अर्थात आदिल खान दुर्रानीवर मारहाण, फसवणूक आणि लैंगिक अत्याचारासारखे गंभीर आरोप केले आहेत
कारागृहाच्या बाहेर येताच आदिल खान हा गर्लफ्रेंड सोबत लग्न करणार असल्याची चर्चा आहे. त्यावर राखी सांवत हीने एक व्हिडिओ शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहे. नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी तिहेरी तलाक कायदा (triple talaq law) आणल्याबद्दल त्यांचे आभार राखीने मानले आहे.
"आदिल मुस्लिम आहे,याचा अर्थ असा नाही की, तो चारवेळा लग्न करेल. आता चौथ्या लग्नासाठी त्याला मुस्लिम धर्मातूनदेखील मान्यता मिळणार नाही. आमच्या लग्नाची कोर्टात नोंदणी झाली आहे. आदिलला मी घटस्फोट देणार नाही," असे राखीनं व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.
"तिहेरी तलाक कायद्यासाठी खरोखरंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खूप-खूप आभार. मला कधी वाटलं नव्हतं की, हा कायदा माझ्या कधी उपयोगी येईल. माझ्यासह अनेक मुस्लिम महिला आम्ही नरेंद्र मोदींचे आभारी आहोत." असे राखी म्हणाली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.