खोपोली : मी नरेंद्र मोदींसोबत गेलो नसतो तर केंद्रीय मंत्री झालो नसतो आणि उद्धव ठाकरे आमच्यासोबत असते तर कदाचित मुख्यमंत्री झाले नसते. मात्र, राजकारणात काही सुद्धा होवू शकते, पुढच्या काळात शिवसेनेचे `बॅक टू पव्हेलियन` होऊ शकते, तशी आमची अपेक्षा आहे. असे विधान आरपीआयचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.
खोपोली नगरपालिकेच्या वतीने बसवण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे केंद्रीय मंत्री आठवले यांच्या हस्ते अनावरन करण्यात आले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेद्रं थोरवे, माजी आमदार सुरेश लाड, पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड, नगराध्यक्ष सुमन औसरमल, उपनगराध्यक्ष विनिता काबंळे याच्यांसह आरपीआय आठवले गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते.
आठवले म्हणाले, ``राजकारणात काहीही होऊ शकते. आजघडीला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवेसना एकत्र आली आहे. तर, भविष्यात भाजप, शिवसेना आणि आरपीाय सुद्धा एकत्र येऊ शकते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी एनडीएत आले पाहिजे.``
डॅा. बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांचे सबंध चागंले होते. मग, उद्धव ठाकरे आणि माझे सबंध का बिघडलेले आहेत? आपले सबंध चागंले असले पाहिजे. उद्धवजींबद्दल मला आदर आहे. त्यांना मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली आहे. कदाचित ते आमच्या सोबत राहिले असते तर, मुख्यमंत्री झाले नसते. अजूनही अडीच-अडीच वर्षाची ऑफर आहे. पण ही ऑफर स्वीकारायची की नाही हे उद्धव ठाकरेंनी ठरवायचे आहे, यानंतर आठवले म्हणाले, मी योग्यवेळी योग्य निर्णय घेतला. मी नरेंद्र मोदींसोबत गेलो नसतो तर केंद्रीय मंत्री झालो नसतो. मात्र, उद्धव ठाकरे आमच्यासोबत असते तर कदाचित ते आज मुख्यमंत्री झाले नसते.
1990 ला मी एकटाच शरद पवारांसोबत गेलो आणि मंत्री झालो. बाकी सगळे मागे राहिले. ही आठवण सांगतांना आठवले म्हणाले, त्यावेळी बाळासाहेब आंबेडकर, गवई साहेब, कवाडे सर यांना मी सांगतो होतो, आमच्या बरोबर चला. त्यावेळी ते बोललो तुम्ही एकटेच जा, मी एकटाच गेलो आणि मंत्री झालो. आणि हे सगळे मागे राहीले, असल्याचे आठवले त्यांच्या शैलीत बोलले. यावेळी उपस्थितांमध्ये एकच खसखस पिकली होती. याबरोवरच ते म्हणाले, रिपब्लीकन पक्षाची ताकद ऐवढी आहे की, कोणाला पाडायचे आणि कोणाला निवडून आणायचे ते आम्ही ठरवतो. मात्र, आमची माणस निवडून आणण्याची सवय आम्हाला नाही. आमचा माणूस उभा राहिला की आणखी 10-15 माणसे उभे राहतात अन् मग सगळेच पडतात, असेही विनोदी शैलात ते म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.