Ramdas Athawale On Nitish Kumar :  Sarkarnama
मुंबई

Ramdas Athawale On Opposition Meeting : विरोधकांनो कितीही बैठका घ्या, जिंकणार तर मोदीच; आठवलेंनी ठणकावलं!

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : बिहारच्या राजधानीच्या शहरात पाटन्यामध्ये १५ विरोधी पक्षांची काल देशातील विरोधी पक्षांची बैठक पार पडली. भाजपविरोधी आघाडी उघडण्यासाठी लोकसभा निवडणुकीत अनुषंगाने या बैठकीत चर्चा झाली. या सर्व विरोधीपक्षांनी आगामी काळातील निवडणुकीत एकत्र येण्यास सहमती दर्शवली आहे. दरम्यान विरोधकांच्या या बैठकीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या खुमासदार शैलीत टीका केली आहे. (Latest Marathi News)

रामदास आठवले म्हणाले, बिहारमध्ये विरोधी पक्ष एकत्र जमतील आपली भूमिकापंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मांडतील. मात्र नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व मजबूत आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही आम्हीच जिंकू. विरोधकांचा पराजय करण्याची निती आमच्याजवळ आहे. विरोधकांनी कितीही बैठका घेतल्या, तरी मोदींना हरवणं सोप्पं नाही, असं आठवले यांनी म्हंटलं आहे.

नितीश कुमारांवर निशाणा -

बिहारचे आताचे मुख्यमंत्री नीतीशकुमार हे आमच्यासोबत भाजप आघाडीसोबत युतीत होते. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं सरकार असताना, ते त्या सरकारमध्ये रेल्वेमंत्रीही होते. पंतप्रधान मोदींच्या काळातही नितीश कुमार हे काही वेळ भाजपसोबत आहे. भाजपसोबत आघाडीत असताना जेडीयूच्या जागा कमी आल्या असतानाही, त्यांनाच मुख्यमंत्री केलं. पण आता नितीश कुमारांची भाषा बदलली आहे, असे रामदास आठवले म्हणाले. (Ramdas Athawale On Opposition Meeting)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT