Uddhav Thackeray-Ramdas kadam Latest News
Uddhav Thackeray-Ramdas kadam Latest News  Sarkarnama
मुंबई

Ramdas Kadam : अजितदादांनी राजीनामा द्यावा, ठाकरेंनी विरोधीपक्षनेता व्हावे, असे रामदास कदम का म्हणाले..

सरकारनामा ब्युरो

Ramdas Kadam : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचेप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी औरंगाबाद जिल्ह्यात दौरा केला. परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली. त्यांच्या दौऱ्याची शिंदे गटातील नेते, माजी मंत्री रामदास कदम यांनी खिल्ली उडवली आहे. रामदास कदम यांनी आज आदिवासी बांधवांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. (Ramdas Kadam news update)

उद्धव ठाकरे दौऱ्यावर रामदास कदम यांनी सडकून टीका केली."मला आता अंतःकरणापासून वाटतयं, अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा अन् उद्धव ठाकरे यांनी हे पद स्वीकारावं," अशा शब्दात कदमांनी त्यांना टोला हाणला.

"अडीच वर्षात उद्धव ठाकरेंनी एकही महत्त्वाचा निर्णय घेतला नाही. मंत्रालयात येऊन सक्रीय कामगिरीही केली नाही. त्यामुळे माझी एक मागणी आहे. अजित पवार यांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा आणि उद्धव ठाकरे यांनी हे पद त्यांच्याकडे घ्यावे," असा टोला रामदास कदम यांनी लगावला.

"पावसामुळे कोकणात मोठे संकट आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे त्यांचे अश्रू पुसायला, मदत करायला गेले नाहीत. त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे हेही गेले नाहीत,अडीच वर्षांत उद्धव ठाकरे मातोश्रीबाहेर पडले नाहीत.अडीच वर्षांत केवळ दोन ते तीन वेळा मंत्रालयात आले. अडीच वर्षांत एकही निर्णय झाला नाही,त्याची अंमलबजावणी झाली नाही," असे कदम म्हणाले.

"आज मला आनंद होत आहे की उद्धवजी कोल्हापुरात शेतकर्‍यांकडे गेले. त्यांना किती माहिती आहे माहीत नाही, पण अजूनही पंचनामा सुरू आहे…आणि जोपर्यंत पंचनामा होत नाही तोपर्यंत मदत करता येणार नाही, उद्धव ठाकरे तिथे दिखावा करण्यासाठी गेले असा मला वाटते," असा आरोप रामदास कदम केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT