<div class="paragraphs"><p>Member of the Legislative Council</p></div>

Member of the Legislative Council

 

sarkarnama

मुंबई

रामदास कदमांनी परबांसोबतचा फोटोही टाळला

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : विधान परिषदेतून आज (ता. २७) आठ आमदार निवृत्त झाले. विधान परिषदेतील (Legislative Council) निवृत्त आमदारांना निरोप देताना विधिमंडळाच्या पायऱ्यावर फोटोसेशन करण्यात आले. मात्र, या वेळी शिवसेना नेते आणि निवृत्त होणारे आमदार रामदास कदम (Ramdas Kadam) व काँग्रेसचे आमदार भाई जगताप (Bhai Jagtap) अनुपस्थित होते.

विधान परिषदेच्या निवृत्त सदस्यांसाठी विधान परिषद सभापती आणि उपसभापती यांच्या बरोबर विधीमंडळाच्या कामकाजाची आठवण म्हणून फोटो काढले जातात. हे फोटो काढते वेळी रामदास कदम आणि भाई जगताप अनुपस्थित राहिले. शिवसेना तेने व परिवह मंत्री अनिल परब यांच्या बरोबर फोटो काढला जाऊ नये म्हणून रामदास कदम हे अनुपस्थित राहिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, भाई जगताप यांनी अनुपस्थतीत राहून कोणाबरोबर नाराजी व्यक्त केली, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Member of the Legislative Council

विधान परिषदेतून कदम यांच्यासह अरुण जगताप, प्रशांत जगताप, गिरीचंद्र व्यास, भाई जगताप, गोपीकिशन बजोरिया, अमरिश पटेल, सतेज पाटील या आठ सदस्यांचा कालावधी संपत आहे. मात्र, पटेल आणि पाटील हे पुन्हा विधान परिषदेत निवडून आले आहेत. त्यामुळे अन्य सहाजणांसाठी विधान परिषदेत निरोपाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विधान परिषदेत दुपारी तीन वाजता कामकाजाला सुरवात झाली; तेव्हा निरोपाचा कार्यक्रमाचे नियोजन झाले.

Member of the Legislative Council

त्यावेळी सभागृहात एकही मंत्री नसल्याने सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दहा मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले. त्यानंतर सव्वातीन वाजता परब विधान परिषदेत आले. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू हेही परिषदेत आले. परंतु गायकवाड आणि कडू काही मिनिटात सभागृहातून निघून गेले. मात्र, परब बसून राहिले; तेही हातातली कामे संपवत होते. परब यांनी सरकारच्या वतीने निवृत्त होणाऱ्या सदस्यांविषयी भाष्य केले नाही.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या विश्वासातल्या परबांवर हल्ला चढविलेल्या कदम यांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला कोण येणार, याची उत्सुकता होती. त्यात मात्र परब पहिले आले. शिवसेनेत, विरोधीपक्ष नेते, मंत्रीपदावर असताना कदम यांनी केलेल्या कामांचा गौरव करीत, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह दरेकर, शशिकांत शिंदे यांनी कदम यांना पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. मात्र, विधान परिषदेतील कदम यांचा शेवटा दिवस असतानाही परब काहीच बोलले नाही. त्यानंतर फोटो काढण्यासाठी कदम अनुपस्थित राहिल्याने शिवसेनेतील हा कमद आणि परब संघर्ष संपला नसल्याचेच दिसून आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT