Ramdas Kadam: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केलेल्या ५०० कोटी रुपयांच्या आरोपावरुन दोन दिवस राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. याचा पुरावा म्हणून जरांगेंनी पत्रकार परिषदेत या पैशांच्या देवाण-घेवाणीचा उल्लेख असलेली एक ऑडिओ क्लीप सादर केली. यामुळं एकच खळबळ उडाली आहे. पण या ऑडिओ क्लीपवरुन शिवसेनेचे नेते रामदास कदम चांगलेच भडकले, तसंच जरांगे यांनी ही क्लीप आत्ताच कशी बाहेर आणली? असा सवालही केला.
रामदास कदम म्हणाले, जरांगे मराठा समाजाला न्याय देण्यासाठी दिवस-रात्र कष्ट घेत असताना ही जी क्लीप आपण आज दाखवली ती १४ ऑक्टोबर २०२४ ची आहे. ही दोन ते अडीच वर्षांपूर्वीची क्लीप आपल्याजवळ का ठेवली होती? त्यामुळं काही गोष्टी स्पष्ट होणं गरजेचं आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री यांचं मराठा समाजाला न्याय देण्यासाठी योगदान आहे.
मला आणखी एक तुम्हाला सांगायचं आहे, यासाठी विनोद पाटलांना विचारा की मराठा समाजाला न्याय देण्यासाठी सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी कायदेशीर अभ्यास हा कोणाच्या सांगण्यावरुन झाला हे विचारा. आम्ही पडद्याच्या आड आहोत, म्हणून एक गोष्टी मला स्पष्ट करायची आहे की, दोन-अडीच वर्षानंतर आत्ताच ही क्लीप कशी बाहेर आली? यानंतर लोकसभेची आणि विधानसभेची अशा दोन निवडणुका झाल्या पण तेव्हा ही क्लीप बाहेर का नाही आली?
या ऑडिओ क्लीपमध्ये जे बोलताहेत ते भाजपचेच लोक आहेत, ते कॉन्फरन्सवरती बोलत आहेत. यामधील लोक हे संभाजीनगर, ठाणे, मुंबई या ठिकाणचं कनेक्शन आहे. उद्या अशा प्रकारे कॉन्सफरन्स कॉलवर कोणीही म्हणून शकतं की, आम्ही हजार कोटी दिले, दोन हजार कोटी दिले यांना पाच हजार कोटी दिले. याला शेंडा आणि बुंधा काहीही नाही. मग अडीच वर्षे आपण का थांबलात? आपल्या समाजाच्या नेत्यावर जर काही लोक अशा पद्धतीनं आरोप करुन बदनाम करत असतील तर तुम्ही एकनाथ शिंदेंच्या बाजुनं उभं राहिलं पाहिजे.
माझ्याकडं जरांगेंची आणखी एक क्लीप समोर आली आहे. आपल्या गोपनिय मिटिंगमध्ये भाजपचे आमदार बसले आहेत, त्या मिटिंगमध्ये आपण असे बोलले आहात की या मिटिंगमध्ये एकनाथ शिंदेंचे चमचे बसले आहेत, असं आपण बोललात. माझ्याकडं आहे ती क्लीप. मी हवेत बोलत नाही जबाबदारीनं बोलतो आहे. यामध्ये इंगळे यांनी जरांगेंना सांगितलं की, तुम्ही बोलता ते बरोबर नाही. मग भाजपच्या आमदारांना सोबत घेऊन तुम्ही जर एकनाथ शिंदेंचे चमचे असं जर विधान तुम्ही करत असाल तर एकनाथ शिंदेंबाबत तुमची भूमिका काय आहे? हे स्पष्ट झालं.
दरम्यान, मग आम्ही असं समजायचं का? की 'कुऱ्हाडीचा दांडा, गोतास काळ' म्हणजे आमचा मराठा समाजाचा नेताच आमच्या मराठा समजाच्या नेत्याला संपवतो आहे असं म्हणायचं आहे का? त्यामुळं आपण समाजात फूट पडेल असं वागता कामा नये. मला खूप वाईट वाटलं की, तुम्ही भाजपच्या आमदारांसोबत असलेल्या गोपनिय मिटिंगमध्ये एकनाथ शिंदेंचे चमले म्हणालात. मला विनंती आहे की, आपण मुंगी होऊन साखर खाऊ. ही क्लीप तीन वर्षे आधीची असली तरी त्याची पूर्णपणे चौकशी झाली पाहिजे. त्यात जी महिला म्हणाली, की श्रीकांत शिंदेंच्या मार्फत आम्ही पैसे पोहोचवले ती महिला कोण आहे? हे शोधून काढलं पाहिजे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.