Ramdas Kadam News :
Ramdas Kadam News : sarkarnama
मुंबई

Ramdas Kadam : उद्धव ठाकरेंची तुलना अफजल खानसोबत ; रामदास कदमांचा हल्लाबोल ; ठाकरे गट आक्रमक

सरकारनामा ब्युरो

Ramdas Kadam on uddhav thackeray compared with afzal khan : खेड येथील गोळीबार मैदानावर उद्या (ता.१९) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होत आहेत. याच मैदानावर नुकतीच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा झाली होती. या सभेत ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. त्याला शिंदे काय प्रत्युत्तर देणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.

उद्या होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या या सभेची जबाबदारी शिंदे गटाचे नेते, माजी मंत्री रामदास कदम आणि त्यांचे चिंरजीव आमदार योगेश कदम यांच्यावर आहे. कदम पिता-पुत्रांनी या सभेसाठी जोरदार तयारी केली आहे. योगेश कदम यांनी या सभेचे टीझर प्रदर्शित केले आहे.

रामदास कदम यांनी आज या सभेच्या तयारीचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना रामदास कदम यांनी ठाकरेंची तुलना अफजल खान याच्याशी केली. त्यांच्या या विधानामुळे ठाकरे गट आक्रमक झाला आहे.

"अफजल खान जसा लाखो सैन्य घेऊन महाराष्ट्रावर चाल करून आला होता, अगदी तसेच उद्धव ठाकरे संपूर्ण महाराष्ट्रातून लोक घेऊन खेडच्या सभेला आले होते," अशा शब्दात रामदास कदम यांनी ठाकरेंवर टीका केली.

"१९ मार्चला होणारी सभा ही फक्त कोकणवासीयांची असेल आणि तुम्हाला समजेल कोकणी जनता ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रामदास कदम यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी उठाव केला नसता तर आम्ही राजकारणातून संपलो असतो. त्यामुळे उद्याची सभा ऐतिहासिक ठरेल," असा विश्वास कदम यांनी व्यक्त केला.

"उद्धव ठाकरे यांनीच मला गुहागर येथे पाडले. ठाकरे यांनी आम्हाला संपविण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. मी तिथे गाफील राहिलो. आमदार योगेश कदमचे तिकीट कापण्यासाठी प्रयत्न झाले पण ते माझ्यापुढे यशस्वी झाले नाही. पण आता २०२४ला भास्कर जाधवांना आम्ही त्यांची जागा दाखवून देऊ," असा इशारा रामदास कदम यांनी ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधवांना दिला.

आमदार योगेश कदम यांनी या सभेचा टीझर पोस्ट केला आहे. रामदास कदम यांनी खेड परिसरात बॅनरबाजी करीत ठाकरे गटाला डिवचलं आहे. "करारा जवाब मिलेगा" अशा आशयाचे बॅनर रामदास कदम यांनी लावले आहेत.

५ मार्च रोजी उद्धव ठाकरे यांनी खेडमध्ये सभा घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व रामदास कदम यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. खेडमधील गोळीबार मैदानातही विराट जाहीर सभा झाली होती. आता त्याच मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सभा होत आहे. शिंदे गटाकडून यासभेची जोरदार तयारीसुरू असून ठाकरेंच्या आरोपाला ते कसे उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उद्धव ठाकरेंच्या टीकेवर एकनाथ शिंदे काय प्रत्युत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागल आहे. ठाकरेंची गोळीबार मैदानात सभा झाली होती, याच मैदानात मुख्यमंत्र्यांनी सभा होत आहे. रामदास कदम यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. गोळीबार मैदानात सभेची तयारी अंतिम टप्यात आहे. गोळीबार मैदानात गर्दी जमविण्यासाठी कदम पिता-पुत्र कामाला लागले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT