Ramdas Kadam
Ramdas Kadam sarkarnama
मुंबई

रश्मी ठाकरेंबद्दल तसं बोलायला नको होतं; रामदास कदमांना उपरती

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी ठाकरे कुटुंबीयांवर केलेल्या टीकेचे पडसाद राज्यभरात उमटले. त्यावर खुद्द कदम यांनी प्रतिक्रिया दिली रश्मी ठाकरेंबद्दल तसे बोलायला नको होते, मी माझे शब्द मागे घेतो, असे कदम म्हणाले. मी अनवधानाने बोलून गेलो, माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे कदम म्हणाले. मुंबईत शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटप्रमुखांचा मेळावा थोड्याच वेळात घेणार आहेत. त्याआधीच कदमांनी एक पाऊल मागे घेतले आहे.

रश्मी ठाकरे यांच्या बद्दल मी तसे बोलायला नको होते. मी माझे शब्द मागे घेतो. मी अनवधानाने बोलून गेलो. माझ्या वक्तव्याचा अर्थ चुकीचा काढला गेला. ठाकरेंचा अपमान होईल असे काही बोललो नाही. मात्र, माझ्या चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचे कदम यांनी सांगितले.

सुषमा अंधारे कोण? मी ओळखत नाही, असा टोला लगावत, कदम यांनी टीका केली. आंदोलनांना मी घाबरत नाही, अशा इशाराही कदम यांनी दिला. तीन वर्ष माझे तोंड बंद केले होते. माझ्या मुलाला त्रास दिला, आमचा काय गुन्हा? असा सवाल कदम यांनी उपस्थित केला.

रामदास कमद काय म्हणाले होते?

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे वारंवार मी बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा आहे, असे सांगतात. मात्र, ही गोष्ट किती वेळा सांगायची. तुम्ही बाळासाहेबांचे पुत्र आहात. याबाबत संशय आहे का? तुम्ही बाळासाहेबांचे पुत्र नाहीत, असे आम्ही म्हटले आहे का, असे तिखट सवाल कदम यांनी उपस्थित केले होते.

मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे कुठेही गेले तरी रश्मी वहिनी त्यांच्यासोबत असायच्या. माँसाहेब मीनाताई ठाकरे या आयुष्यात कधीही व्यासपीठावर चढल्या नाही. मात्र, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना केवळ तीन वेळा मंत्रालयात गेले. इतर वेळी ते मातोश्रीवर लपून खोके मोजण्याचे काम करत होते, असा घणाघाती आरोप कदम यांनी केला होता. रश्मी ठाकरे या वर्षा बंगल्यावर कंत्राटदारांना भेटत होत्या, असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला होता.

रामदास कदम यांच्या वक्तव्यानंतर शिवसैनिक राज्यभर आक्रमक झाले होते. त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले आहे. तर कुठे त्यांच्या विरोधात शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शिवसेना नेत्यांकडून त्यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदवला गेला, त्यामुळे कदम यांनी आपन तसे बोलायला नको होते, असे म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT